nitin  sakal
नागपूर

नागपूर : विकासाच्या विरोधकांविरुद्ध जनतेने पुढाकार घ्यावा

नितीन गडकरी यांनी टोचले नागपुरकरांचे कान

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील काहींनी पर्यावरणाच्या नावावर अजनी मल्टीमॉडेल हबला विरोध केला. त्यामुळे तो प्रकल्पच बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु विकास हवा असेल तर विकासाला अनुकूल जनतेलाही गप्प बसून चालणार नाही. एक एक लाख लोकांनी हस्ताक्षर करून शहराच्या विकासाचे कामे रोखू नये, अशी याचिका कोर्टात याचिका दाखल करायला पाहिजे, असे नमुद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी विकासाला विरोध होत असताना मौन धरणाऱ्या नागपूरकरांचेही कान टोचले.

वर्धा मार्गावरील डबल डेकर पूल व त्यावरील तीन मेट्रो स्टेशन तयार करणारी महामेट्रो व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय) नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. या दोन्ही संस्थांकडून रविवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित व एनएचएआयचे राजीव अग्रवाल यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनच्या सभागृहात झालेल्या या समारंभात महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी चित्रा जैन, आशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी डॉ. सुनीता धोटे, समन्वयक प्रकाश पोहरे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नागपूर मेट्रो देशात सर्वोत्तम असल्याचे नमुद करीत गडकरी म्हणाले, पुण्यातही आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरसारखीच मेट्रो तयार करण्याचे सांगितले.

या डबल डेकर पुलासाठी काम करताना महामेट्रो व एनएचआयचा प्रत्येकी २०, अर्थात ४० टक्के खर्च वाचला. कामठी रोडवरही असाच उड्डाणपूल तयार होत आहे. दोन महिन्यांत या पुलाचेही उद्‍घाटन होईल. परंतु वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलाचे एक्सपान्शन पॉईंट सदोष असून दुरुस्तीवर भर देण्याची सूचना त्यांनी केली. आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे नवीन विमानतळाचे कामही लवकरच सुरू होईल. महामेट्रोने आपली बस चालवायला घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. प्रास्ताविक प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी तर संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे यांनी आभार मानले.

मेट्रोची बदनामी करणाऱ्यांचेही टोचले कान

काही महिन्यांपूर्वी शहरातील एका नेत्याने तृतियपंथीयांना सोबत घेऊन प्रवास केला. परंतु त्यावेळी जे काही करण्यात आले. त्यातून मेट्रोची देशभरात बदनामी झाली. मेट्रोच्या नाव नागपूरच्या प्रतिष्ठेसोबत जोडले आहे. त्यामुळे तो प्रकार चुकीचा होता, असे नमुद करीत त्यांनी त्या शहरातील नेत्याचेही कान टोचले.

आणखी एका विक्रमासाठी सज्ज ः डॉ. दिक्षित

आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतलेली दखल मागील सात वर्षात केलेल्या कामाची पावती आहे. आता आणखी एक रेकॉर्ड करण्यासाठी मेट्रो सज्ज असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित यांनी सांगितले. नवा रेकॉर्ड नव्या तंत्रज्ञानासह होईल. प्रवासी संख्येचेही नवे विक्रम होत असल्याचे ते म्हणाले.

साऊथ एअरपोर्ट स्टेशन ः केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विक्रमाची नोंद झाल्याचे प्रमाणपत्र स्वीकारताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित, एनएचएआयचे राजीव अग्रवाल. यावेळी उपस्थित महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, आशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या डॉ. सुनीता धोटे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या चित्रा जैन, आशिया व इंडिया बुक रेकॉर्डच्या निर्णायक मंडळाचे प्रकाश पोहरे.

कळमना ते वासुदेवनगर ट्रॉलीबस

कळमना मार्केट ते हिंगणा रोडवरील वासुदेवनगर, या रिंगरोडने ट्रॉली बसचा (हवेतील बस) डीपीआर तयार करण्याच्या सूचना त्यांना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित यांना केल्या. सोमलवाडा ते मनीषनगर व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ते झिरो माईल, अशा दोन भुयारी मार्गांचे कामही मेट्रोने करावे, असे गडकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT