guru Padmambhushan Sri M sakal
नागपूर

Nagpur : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू पद्ममभूषण श्री एम नागपूरात पहिल्यांदाच

साध्य करण्याची प्रेरक शक्ती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मानवी मनावर असलेल्या विविध बाह्य शक्तीच्या ताब्यामुळे साध्य असेल तेही असाध्य होऊन जाते. मनाच्या मुक्तीचे मार्ग सांगत जगभरातील असंख्य लोकांना असाध्य ते साध्य करण्याची प्रेरक शक्ती बहाल ज्यांनी केली ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू पद्ममभूषण श्री एम नागपूर नगरीत पहिल्यांदाच येत आहेत. त्यांचे सत्संग प्रवचन ऐकण्यासाठी विदर्भभरातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपली जागा आजच बुक करा, असे आवाहन आयोजक म्हणून `सकाळ माध्यम समूह` आणि `सत्संग फाउंडेशन`च्या वतीने करण्यात आले आहे.

मानवतेचा सुंदर संदेश सांगत आणि मनावर असलेले विविध जळमट दूर करीत जगभरातील अनेक देशांमधील असंख्य लोकांमध्ये श्री एम यांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. म्हणूनच त्यांचे जगभर अनुयायी तयार झाले आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आणि `सत्संग फाउंडेशन`च्या सहयोगाने श्री एम यांचे सत्संग प्रवचन नागपूर येथे येत्या १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून रसिकांसाठी ही ज्ञानामृत प्राशनाची अध्यात्मिक पर्वणी ठरणार आहेच. सोबतच मनाच्या मुक्तीचे अनेक मार्ग ते सांगणार आहेत.

श्री एम यांचे तेजपुंज दर्शन आणि अमोघ अमृत वाणी यामुळे जगभरात त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सामाजिक सद्‍भाव, एकता, सौहार्द या मूल्यांची शिकवण ते देतात. यासाठी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्राही पूर्ण केली. त्यांच्या प्रवचनामुळे मानवी हृदयात सकारात्मक परिवर्तन होते. जीवनाकडे बघण्याची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. हिमालयात कठोर तपश्चर्या करून श्री एम यांनी `आध्यात्मिक सिद्धी` प्राप्त केली आहे. त्यांची अमोघ अमृतवाणी १७ डिसेंबर २०२२ रोजी त्यांच्या सत्संग सोहळ्यातून अनुभवायास मिळणार आहे.

ज्ञानार्जनाची असीम जीवनयात्रा

श्री एम यांची योगगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही जगभर ख्याती आहे. आध्यात्मिक गुरू होण्याचा त्यांचा प्रवास अद्‍भूत आहे. केरळमध्ये एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना गुरूदर्शन झाले. त्यानंतर आध्यात्मिक ओढीने वयाच्या १९ व्या वर्षी ते एकटेच हिमालयात निघून गेले. बद्रीनाथजवळील एका प्राचीन गुहेत त्यांना त्याच गुरूंचे दर्शन झाले.

असे म्हणतात की, त्यांच्यासोबत यापूर्वी झालेल्या पहिल्या भेटीचे स्मरणही त्यांना येथे झाले. त्यांच्या सान्निध्यात श्री एम यांनी कठोर ध्यानधारणा आणि तपश्चर्या केली. तीन वर्षांच्या काळानंतर त्यांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाली. यादरम्यान आणि पुढे त्यांनी अनेक संत-महंतांसोबत भेटी घेत ज्ञानपूर्तता केली. तिबेटमध्येही ते फिरून आले. गुरूंच्या आदेशानंतर त्यांनी आपले जीवन लोकोन्नतीसाठी मिशन म्हणून व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षे त्यांनी रामकृष्ण मिशन आणि कृष्णमूर्ती फाउंडेशनमध्ये व्यतीत केले. पुढे त्यांनी प्रवचन देणे सुरू केले.

स्थळ-वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर

तारीख-१७ डिसेंबर २०२२

वेळ- सायंकाळी ५.३०

आपली जागा आजच आरक्षित करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी मोठे भाकीत; कोकण, मध्य महाराष्ट्रसह घाटमाथ्यावर बरसणार पाऊस

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT