Nagpur Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : अपहरणकर्त्याची ५ लाख देण्याची होती तयारी ?चौकशीतून खुलासा; पंधरा लाखांवर अडल्याने फसला डाव

नागपूरमध्ये व्यावसायिकाचे अपहरण करून १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघांना हुडकेश्‍वर पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : व्यावसायिकाचे अपहरण करीत, त्याला पंधरा लाखाची खंडणी मागणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघाना हुडकेश्‍वर पोलिसांनी अटक केली. दरम्यान तपासात अपहरणकर्त्याने त्यांना पाच लाख देण्याची तयारी दर्शविली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

गौरव पुरुषोत्तम पराळे (वय ३०, रघुजीनगर), राजेश उत्तमराव हिवराळे (वय ३०, सीताबर्डी क्वार्टर), आकाश राजू ग्वालबंशी (वय ३०, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्‍वर) यांनी आयबीन फ्लिपकॉर्प ट्रेड कंपनीचे मालक अजय वाघमारे यांना क्वीन्स सेलिब्रेशन लॉनसमोरून आपल्या वाहनात बसवून त्यांचे २९ सप्टेंबरला अपहरण केले होते.

दरम्यान त्यांना २० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्याची धमकी देत, १५ लाख रुपयाची मागणी केली होती. मात्र, पैसे देण्यासाठी सहकाऱ्याला फोन केल्यावर त्यांच्या सहकाऱ्याने हुडकेश्‍वर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून हुडकेश्‍वर पोलिसांनी आरोपींचे लोकेशन काढून हॉटेल रेडिसन ब्ल्यूजवळ तिघांना अटक केली होती.

घटनेतील मास्टरमाईंड विक्रांत मेश्राम (रा.उमरेड) अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अपहरणादरम्यान राजेश आणि गौरव याने त्याला पंधरा लाखाची मागणी केल्यावर अजय वाघमारे यांनी त्यांना ५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, दोघेही पंधरा लाखावर अडून बसल्याने प्रकरण वाढल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. दरम्यान आरोपींना अटक केल्यावर वाघमारेही मुंबईला परत गेल्याची माहिती आहे.

पोलिस ठाण्यात नाही नोंद

पोलिसांना आपली हद्द सोडून दुसऱ्या हद्दीत कारवाई करीत असताना, आपल्या वरिष्ठांना माहिती देत, ठाण्यात याबाबत नोंद करावी लागते. मात्र, बीट मार्शल राजेश हिवराळे आणि गौरव पराळे यांनी अशी कुठलीही नोंद केली नसून वरिष्ठांनाही माहिती दिली नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनीही दुजोरा दिला.

दोघेही कर्मचारी निलंबित

हुडकेश्‍वर पोलिसांनी अपहरण आणि खंडणी मागणाऱ्या बजाजनगर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल राजेश हिवराळे आणि गौरव पराळे यांना पोलिस उपायुक्तांनी निलंबित केल्याची माहिती आहे. त्याबाबत पोलिस ठाण्यातून प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI New Rule: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी अलर्ट! 10,000 रुपयांपेक्षा जास्त पैशाच्या ट्रान्सफरवर RBI नवीन नियम लावणार

नवरा, बायको आणि मित्र… तिघेही दिव्यांग; पण एका रात्रीत घडली पतीच्या हत्येची थरारक घटना, मारेकरी कोण? संवाद नसताना तपास कसा झाला?

‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप! न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड

कपडे शिवून घेण्यासाठी दुकानात गेली; ब्लाऊजचं माप घेत असताना तरुणीसोबत नको ते घडलं...

Fertilizer Price Hike : बळीराजाला खत दरवाढीचा झटका; केंद्र सरकारकडून अनुदानात वाढ, तरीही कंपन्यांकडून रासायनिक खताची दरवाढ

SCROLL FOR NEXT