Nagpur Lake Excavation drainage line cleaning stop
Nagpur Lake Excavation drainage line cleaning stop 
नागपूर

नागपूर : तलाव खोलीकरण, नालेसफाई अडकली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलाव खोलीकरण व नाले सफाई आवश्यक असते. पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा काळ होत असताना अद्याप कामे झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. विशेष म्हणजे या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) वर्ष २०२१-२२ मधील १० ते १२ कोटींचा निधी मार्च महिन्यात मिळाला. तर वर्ष २०२२-२३ मध्ये कामे करण्यासाठी काही निधी मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार विभागाकडून निविदाही काढण्यात आल्या.

परंतु त्या उघडण्यात आल्या नाही. दीड महिन्यापासून निविदा उघडण्यात आल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. तर अर्थनियोजनातून निविदा उघडल्या नसल्याचे सांगण्यात येते. काही विशिष्ट कंत्राटदारांनाच कामे देण्यासाठी हा सर्व खटाटोप करण्यात येत असल्याचीही चर्चा आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या खेळीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तलाव खोलीकरण व नदी,नाले सफाई करणाची कामे झाली असती तर यातील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना झाला असता. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही.

त्यामुळे वेळीच काम झाले असते तर यातील पाणी शेतकऱ्यांच्या कामी आले असते, असे सांगण्यात येते. परंतु विभागाचे ढिसाळ नियोजन व अर्थपूर्तीतून होत असलेल्या विलंबाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दीड महिन्यापासून निविदा उघडण्यात आल्या नसतांनाही पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची दखल घेण्यात आली नसल्यानेही विविध तर्क लावण्यात येत आहे. कर्मचारी नवीन असल्याने प्रक्रियेस विलंब होत असल्याचे विभागाकडून सांगण्यात येते. परंतु गेल्या काही महिन्यापासून विभागातील कामाची गतीच मंदावल्याचे सांगण्यात येते.

कंत्राटदारांचा होणार फायदा

आता पावसाळा सुरू झाला आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात काम करणे अवघड होणार आहे. कंत्राटदारांकडून काम करण्यात आले तर खोलीकरण व सफाई पाहिजे त्या प्रमाणात होणार नाही. त्यामुळे याचा फायदा कंत्राटदारांना होणार आहे. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी निविदा उघडण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT