Nagpur sakal
नागपूर

Nagpur : महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय

सभापती निवडणुकीत राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, अवंतिका लेकुरवाळे

राजेश नागरे

नागपूर : जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांसाठी आज, मंगळवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. कॉंग्रेसचे राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, अवंतिका लेकुरवाळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळू उर्फ प्रवीण जोध विजय झाले आहेत.

उमेदवारी संदर्भात सकाळीच कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सर्व सदस्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सभापती पदासाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. सभापती पदासाठी अनेक जण इच्छुक होते. नावे जाहीर करताच काहींना धक्का बसला. रामटेक विधानसभा मतदारसंघातून दुधाराम सव्वालाखे व शांता कुमरे यांच्या नावाची चर्चा असताना राजकुमार कुसुंबे यांचे नाव जाहीर केले. ते सुनील केदार यांचे विश्वासू मानले जातात. मिलिंद सुटे यांच्या नावाला उमरेडमधील काही नेत्यांनी विरोध केल्याची माहिती पण केदार व माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांची बाजू घेतल्याने त्यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना ३८ मते मिळाली तर भाजपच्या उमेदवारांना केवळ १३ मतांवर समाधान मानावे लागले.

भाजपने ऐनवेळी घेतला

निवडणुकीचा निर्णय

आज सकाळीच भाजपची बैठक झाली. यात निवडणूक लढावे की नाही, याबाबत चर्चा झाली. कॉंग्रेस सदस्यांची साथ मिळणार नसल्याने ही निवडणूक न लढण्याबाबत काहींचा सूर होता. निवडणूक न लढल्यास वेगळा संदेश जाईल, असाही सूर निघाल्याने ऐनवेळी भाजपने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. विरोध पक्षनेते अनुपस्थित असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला.

महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय

निवडणुकीच्या काळात ने बाहेर गेल्याने काही सदस्यांना नाराजी व्यक्त केली.

बंग गटाला धक्का

दिनेश बंग यांना सभापती मिळण्यासाठी बंग गटाचा आग्रह होता. परंतु, स्थायी समितीसह गट नेतेही पदही त्यांच्याकडे असल्याचा मुद्दा उपस्थित करीत विरोध झाला. काटोल मतदारसंघाला गेल्यावेळी पद न मिळाल्याने या मतदारसंघात ते देण्याची मागणी देशमुख गटाची होती. त्यामुळे शेवटी देशमुख गटाच्या बाळू जोध यांना उमेदवारी देण्यात आली.

उमेदवार व त्यांना मिळालेली मते

शिक्षण व अर्थ सभापती (संभाव्य)

राजकुमार कुसुंबे (काँग्रेस) - ३८

प्रमिला दंडारे (भाजप) - १३

कृषी समिती (संभाव्य)

बाळू जोध (राष्ट्रवादी) - ३८

सतीश दंडारे (भाजप) - १३

समाजकल्याण समिती

मिलिंद सुटे (काँग्रेस) - ३८

सुभाष गुजरकर - १३

महिला व बाल कल्याण समिती

अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस) - ३८

पुष्पा चाफले (भाजप) - १३

कंभाले, कवरे, झाडेसह सहा अनुपस्‍थित, मानकर तटस्थ

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवणारे नाना कंभाले व प्रीतम कवरे हे अनुपस्थित होते. त्याच प्रमाणे शिवसेना (शिंदे समर्थक) सदस्य संजय झाडे यांनी सुद्धा येणे टाळले. अप्रत्यक्षरीत्या त्यांनी भाजपचे संख्याबळ कमी केले. त्याचप्रमाणे विरोध पक्षनेते आतिश उमरे, राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख व कॉंग्रेस सदस्य शंकर डडमलही अनुपस्थित होते. मागील निवडणुकीत बंडखोरांना मतदान करणाऱ्या मेघा मानकर यांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT