लैंगिक अत्याचार Sakal
नागपूर

चॉकलेटचं आमिष दाखवून सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

या घटनेने खळबळ उडाली आहे.

मनोज खुटाटे

जलालखेडा (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील बेलोना येथे राहणाऱ्या सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने संशयित नराधमास ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक केली आहे. (Nagpur Crime News)

नरखेड तालुक्यातील बेलोना येथे पीडित सहा वर्षीय मुलगी आईवडिलांसह राहते. काल (ता. २५) सायंकाळी ७.३० वाजता सुमारास पीडित मुलगी शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी गावातच राहणाऱ्या आरोपी निखिल केशव मस्के वय २३ रा. बेलोना याने घरात अनधिकृत प्रवेश करून मुलीला चॉकलेटचे अमिष दाखवून चुकीच्या भावनेने तिचा लाड करून बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीच्या नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नरखेड पोलिसांत धाव घेतली.

सदर प्रकरणी फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी विरुद्ध कलम ३४६ (अ ब ), ४५१ भादवी सहकलम ४,६ बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हाचा पुढील तपास काटोल विभागाचे पास्को सेलच्या पोउपनी पूनम कोरडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT