Nagpur  Esaka
नागपूर

Lok Sabha: काँग्रेस व भाजप कोणालाच जुमानत नाही, उबाठा, राष्ट्रवादी व शिंदे सेनेची नाराजी; रामटेकमध्ये धुसफूस

लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय विश्व सध्या चांगलच तापलय. निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊनही काही पक्षाच्या उमेदवारांची यादी अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

Congress and BJP Political Loksabha Election: काँग्रेसचे नेते सुनील केदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारत नाही तर दुसरीकडे भाजपचे नेते मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत, अशा तक्रारी सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत सुरू आहेत.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीने राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. ते मूळचे काँग्रेसी असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हाती धनुष्यबाण दिला आहे. रामटेक भाजपला हवे होते. मात्र शिंदे सेनेने शेवटपर्यंत ही जागा सोडली नाही. शेवटी विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून भाजपच्या इच्छेनुसार राजू पारवे यांना तिकीट देण्यात आले. ते महायुतीचे उमेदवार आहेत.

मात्र, भाजपने संपूर्ण रामटेक आपल्या हाती घेतले असून प्रचाराची सर्व धुरा भाजपचेच नेतेच वाहात आहे. मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीही आपल्या सोबत आहे याचा विसर त्यांना पडला आहे. (Latest Marathi News)

सेना-राष्ट्रवादीच्या चार-दोन पदाधिकाऱ्यांना बैठकांना बोलावले जाते. दुसरीकडे गावागावात प्रचार करताना भाजपचेच कार्यकर्ते आघाडीवर असतात. त्यामुळे सेना व राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी चांगलेच वैतागले आहेत. महायुती लोकसभेत आहे, मात्र जिल्हा परिषद, ग्रामपंचयती आम्हाला लढायच्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. किमान आमच्या गावात तरी असे प्रकार करू नका अशी त्यांची विनंती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT