Loksabha Election Affected Tourism  Esakal
नागपूर

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीचा पर्यटनाला फटका, कर्मचारी आणि शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुटीतील पर्यटनाचे बेत केले रद्द

कोरोना काळानंतर पर्यटन व्यवसायाला बळ मिळत असताना आता लोकसभेच्या निवडणुकीमुळे त्याला ब्रेक लागला आहे. अनेक शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुटीतील पर्यटनाचे बेत रद्द केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Loksabha Election Affecting Tourism: कोरोना काळानंतर पर्यटन व्यवसायाला बळ मिळत असताना आता लोकसभेच्या निवडणुकीमुळे त्याला ब्रेक लागला आहे. अनेक शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुटीतील पर्यटनाचे बेत रद्द केले आहेत. पर्यटन कंपन्यांकडील पर्यटनाबाबतच्या चौकशीचे प्रमाणही २५ ते ३० टक्के कमी झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.

निवडणुकीचे प्रदीर्घ वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याबद्दलही सरकारकडून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे मतदानाला प्राधान्य दिले जात आहे. पर्यटन हंगामावर याचा परिणाम होण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

याविषयी चिंता व्यक्त करीत हिमाचल प्रदेश ट्रॅव्हल एजंट असोसिएशनने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. त्यात हिमाचल प्रदेशात पहिल्या टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. हिमाचल प्रदेशात एप्रिल, मे आणि जून महिन्यात पर्यटन हंगाम असतो. या काळातच निवडणूक आहे.

उन्हाळ्यात शाळेला सुट्या असल्याने पालकही पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात. यंदा मात्र, निवडणुकीमुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांसह इतरांच्याही मनसुब्यावर पाणी फिरले आहे. कारण निवडणूक काळात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुटी मिळणे अवघड असते. त्यांना निवडणुकीच्या कामात सहभागी व्हावे लागते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्या शहरातच घालवाव्या लागणार आहे. परिणामी पर्यटनाला जाण्याचा निर्णय अनेकांनी रद्द केल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

जम्मू कश्मीर, लेह-लद्दाख, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, उत्तराचंल, हिमाचल प्रदेश, दार्जिलींग, डलहौसी, मसुरी या ठिकाणांसह आता नवीन राज्यांकडे पर्यटकांचा कल वाढू लागला आहे. त्यात अरुणाचल प्रदेश, नागालॅंड आदी राज्ये आहेत. दरवर्षी मार्च महिन्यात बुकिंगचे प्रमाण कमीच असते. एप्रिलनंतर पर्यटनाची तयारी होत असल्याने विविध स्थळांबद्दल विचारणा होते. परंतु, यंदा निवडणुकीमुळे पर्यटन व्यवसायाला फटका बसणार आहे. ६० टक्केच व्यवसाय होण्याची शक्यता आहे.- विश्वनाथ उपाध्याय, अध्यक्ष, टुरिझम इंटरप्रिन्युअर्स नेटवर्क.

हिमाचलमधील पर्यटन व्यवसायावर कोरोनाचा वाईट परिणाम झाला आहे. हिमाचल प्रदेशातील लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्याऐवजी पहिल्या टप्प्यात घेण्यात याव्यात अशी मागणीही स्थानिक पर्यटन कंपन्यांनी केली आहे. देशभरातील निवडणुकीमुळे पर्यटन कमी होणार आहेत. हिमाचलचा ७५ टक्के लोक पर्यटन व्यवसायाशी निगडीत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.- बुद्धी प्रकाश ठाकूर, अध्यक्ष ट्रॅव्हल एजंट असोसिएशन हिमाचल प्रदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT