Manohar Mhaisalkar
Manohar Mhaisalkar sakal
नागपूर

Nagpur : मनोहर म्हैसाळकर अनंतात विलीन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मनोहर म्हैसाळकरांवर आज सकाळी १०.३० वाजता भावपूर्ण वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी अर्चना देव यांनी अंतिम विधी करीत मुखाग्नी दिला. यावेळी आप्त स्वकीयांसह साहित्य, नाट्य, विधी, सामाजिक आणि माध्यम जगतातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

सकाळी १० वाजताच्या सुमारास सिव्हिल लाइन्स येथील न्यायमूर्ती रोहीत देव यांच्या निवासस्थानावरून अंबाझरी घाटासाठी अंत्ययात्रा निघाली. तत्पूर्वी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. १०.३० वाजता अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर अंबाझरी घाटावर डॉ. गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. या सभेमध्ये ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार, वि. सा. संघाचे कार्यकारी विश्‍वस्त व निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपुरकर, अ. भा. साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, म्हैसाळकरांची मुलगी अर्चना देव, जावई न्यायमूर्ती रोहित देव उपस्थित होते.

डॉ. गिरीश गांधी म्हणाले, विदर्भातील साहित्यीक, सांस्कृतिक नाट्य क्षेत्रातील एक यशस्वी कुशल संघटक विदर्भाने गमाविला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्याने नवोदित आणि जुन्या साहित्यिकांच्या पिढीशी संबंध ठेवणारे मनोहरराव होते. महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांशी त्याचे अतिशय जवळचे संबंध होते. इतक्या वर्षांपर्यंत त्यांनी विदर्भ साहित्य संघाला दिलेले नेत्तृत्व वाखाडण्या जोगे आहे. वि. सा. संघ असो, रंजन कला मंदिर असो किंवा स्वरसाधना असो या तीनही संस्थानाच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य लोक कधीही विसरू शकणार नाही. असे मनोहरराव आता होणे नाही, असेही ते म्हणाले. सभेचे निवेदन संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश एदलाबादकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! टोल नाक्यावर 160 रूपयांसाठी वाद; महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर चढवली कार अन्...VIDEO VIRAL

IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Weather Updates: यंदा मान्सून कधी होणार दाखल? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली माहिती, अंदमानमध्ये 'या' तारखेला एन्ट्री

मोठी बातमी! अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार भरपाई; काय आहे योजना, कोठे करायचा अर्ज; राज्यात सोलापुरातून पहिली शिफारस

SCROLL FOR NEXT