नागपूर : रशिया, युरोपसह आस्ट्रोलियात पुन्हा कोरोनाचा रुग्ण वाढू लागले आहे. असे असताना विमान फेऱ्यावर मर्यादा, कंटेनरची अडचण, इंधन दरवाढ, घरपोच सेवा शुल्कात झालेली वाढ झालेली आहे. यामुळे परदेशातील भारतीयांपर्यंत दिवाळीचा फराळ विलंबाने मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भातून सोनपापडी, संत्रा बर्फीसह इतरही फराळाच्या पदार्थांची निर्यात केली जाते. यंदा त्याला महागाईचा फटका बसला आहे.
भारतीय फराळाला विदेशात शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त परदेशात राहणारे किंवा स्थायिक झालेली दिवाळीला मागवीत असतात. आपले सणउत्सव साजरे करतात. फरळाशिवाय दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात परदेशात फराळ पाठवला जातो. यंदा मात्र फराळाच्या परदेशवारीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे विदेशातील भारतीयांना भारतीय फराळाची चव चाखता आली नव्हती. यंदा विविध अडचणीमुळे ती चाखण्यासाठी अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.
कोरोनामुळे मालवाहतूक करणाऱ्या विमानांची संख्या कमी करण्यात आली आहे. दर आठवड्याला सिंगापूरला दोन, दुबईला दोन आणि अमेरिकेत चार इतकीच विमाने जात आहेत. ' दिवाळीचा हंगाम असल्याने कुरिअर यंत्रणेवर मोठा ताण आहे. परिणामी फराळ पोहोचायला दिरंगाई होते आहे. अमेरिका, युरोप, दुबई अशा महत्त्वाच्या देशांत फराळ पोहोचायला आठ ते दहा दिवस लागत आहेत असेही एका कंपनीच्या संचालकांनी सांगितले.
इंधनदरवाढीमुळे विमान वाहतूक सेवाही महागली आहे. परिणामी, कुरिअर कंपन्यांनी आपल्या शुल्कात २० ते २५ टक्के वाढ केली आहे. पूर्वी अमेरिकेत एक किलो फराळ पोहोचविण्यासाठी एक हजार ते ११०० रुपये लागायचे. आता त्यात वाढ होऊन १३०० ते १४०० रुपये मोजावे लागत आहे, असे संगीता गावंडे यांनी सांगितले. दरवर्षी आमच्या आप्त परिवाराला फराळ पाठवीत असते. मागील वर्षी कोरोनामुळे पाठविता आले नव्हते. यंदा अधिकचा फराळ पाठविण्याचा विचार होता. मात्र, भाववाढीने आणि कुरीअरच्या शुल्कामुळे आनंदावर विरजण पडले आहे.
रशीया, युरोपमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले आहे. विमानाची संख्याही कमी झालेली आहे. कंटनेरचीही अडचण असल्याने विदेशात फराळ आणि खाद्य पदार्थ पाठविण्यासाठी अडचणीचे जात आहे. बागलादेश, श्रीलंकेत मात्र मिठाई पाठविली जात आहे.
- सूनिल पांचोली, संचालक, सुर धेनुपुर सोनपापडी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.