Nagpur GMC  Esakal
नागपूर

MARD Strike: अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे; विद्यावेतन वाढवण्यचा निर्णय, मेयोसह सुपरस्पेशालिटीमधील रुग्णसेवा पूर्ववत

शहरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी वाढीव विद्यावेतनासाठी हातातील स्टेथेकोप खाली ठेवला. तीन दिवस संप पुकारल्यामुळे येथील रुग्णसेवा विस्कळित झाली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur MARD Resident Doctor Strike: शहरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी वाढीव विद्यावेतनासाठी हातातील स्टेथेकोप खाली ठेवला. तीन दिवस संप पुकारल्यामुळे येथील रुग्णसेवा विस्कळित झाली. रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने विद्यावेतन वाढवण्याचा निर्णय घेतला. रविवारी मध्यरात्रीनंतर निवासी डॉक्टरांनी संप घेतला. सोमवारी सकाळी मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटीत डॉक्टर रुजू झाले आणि रुग्णसेवा पूर्ववत झाली.

मेडिकलमध्ये सुमारे सातशे, मेयोत तीनशे तर सुपरस्पेशालीटी रुग्णालयातही काही निवासी डॉक्टर कार्यरत आहे. निवासी डॉक्टरांनी १० हजार वाढीव विद्यावेतन मिळावे, ते वेळेत व्हावे, प्रत्येक निवासी डॉक्टरला वसतिगृह मिळावे या मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीच्या सायंकाळपासून संप पुकारला होता. संपादरम्यान गंभीर रुग्णांच्या आपत्कालीन व आकस्मिक अपघात विभागात सेवा देणार असल्याचे निवासी डॉक्टरांनी स्पष्ट केले होते.

संपामुळे विविध वॉर्डात डॉक्टरांची संख्या घसरली होती. सर्व वॉर्ड निवासी डॉक्टरांशिवाय होते. शल्यक्रिया विभागातही डॉक्टरअभावी शस्त्रक्रियांची संख्या सुमारे ३० टक्यांनी कमी झाली. दरम्यान शासनाने रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालयासह शासकीय आयुर्वेद शाखेतील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन ९० हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)


त्यानंतर सेंट्रल मार्डने बैठक घेत रात्री उशिरा संप मिटल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागपुरातील तिन्ही शासकीय रुग्णालयांत दहा टक्के निवासी डॉक्टर रविवारी मध्यरात्री कामावर परतले होते. तर ९० टक्के निवासी डॉक्टर सोमवारी (ता.२६) सकाळी रुग्णसेवेत रुजू झाले. सध्या येथील रुग्णसेवा पूर्ववत झाली आहे. दरम्यान स्थगित झालेल्या सर्व शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: राजुर टेंभुर्णी रस्त्यावर भीषण अपघात; कार थेट विहिरीत कोसळून पाच जणांना जलसमाधी, ग्रामस्थांमध्ये हळहळ

Latest Maharashtra News Updates : आंदोलनाला माझा पाठींबा- संजय जाधव खासदार

बाप्पावरच विघ्न! विसर्जन केलेल्या मूर्तींचे कचऱ्यात 'डंपिंग', BMCचे २०० डंपर अडवले; अधिकारी म्हणतात, वरिष्ठांचे आदेश

Satara News:'सातारा जिल्ह्यात बालमृत्यू दरात घट'; गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्के प्रमाण कमी, आरोग्य यंत्रणांच्‍या प्रयत्नांना यश

karad News: 'कचरा वेचताना सापडलेली तीन तोळ्यांची अंगठी परत'; मलकापुरातील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा

SCROLL FOR NEXT