नागपूर

MARD Doctor Strike: शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया थांबल्या! ओपीडीत रुग्णांच्या लांबच लांब, निवासी डॉक्टरांचा संप

Nagpur GMC Government Hospital Strike: निवासी डॉक्टरांच्या संपाचा मेडिकल, मेयो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला फटका बसू लागला आहे. त्यामुळे ओपीडीत लांब रांगा दिसल्या.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur MARD Resident Doctors Strike: निवासी डॉक्टरांच्या संपाचा मेडिकल, मेयो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला फटका बसू लागला आहे. त्यामुळे ओपीडीत लांब रांगा दिसल्या. संपामुळे वरिष्ठ डॉक्टर व प्राध्यापकांना रुग्ण तपासणी करण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र, गोंधळ उडाल्याने अनेक शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत.

निवासी डॉक्टर फक्त आपत्कालीन सेवा देत आहेत. आंदोलन लांबल्यास परिस्थिती चिघळू शकते. शैक्षणिक मानधन ९० हजार रुपये, स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा द्यावी, छात्रवृत्तीमधील अनियमितता दूर करावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत.

दरम्यान, ओपीडी आणि वॉर्डांमध्ये सेवा थंडावली आहे. पहिलाच दिवस असल्याने ओपीडीत फारसा फरक जाणवला नाही. मात्र, विविध चाचण्यांवरही परिणाम झाला. वॉर्डांची जबाबदारी प्रशिक्षित डॉक्टरांकडे देण्यात आली आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरही चोवीस तास तैनात केले आहेत.

केवळ १०० डॉक्टर
मेडिकलमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टरांची संख्या ६७२ आहे. त्यापैकी सुमारे १०० डॉक्टर आपत्कालीन सेवा देत आहेत. तर मेयोच्या ३५० निवासी डॉक्टरांपैकी १०० सेवेत सहभागी आहेत. इतर डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत. मागण्यांबाबत वर्षभरापासून पाठपुरावा सुरू असल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले. सरकार आश्वासने देत आहे. मात्र, ठोस निर्णय घेत नाही. यामुळेच यावेळी मागण्या मान्य होतपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.(latest Marathi News)


२४ तासांत मेडिकल ओपीडीमध्ये २२०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. दररोज मेडिकलमध्ये सुमारे २०० नियोजित शस्त्रक्रिया, मेयोत १०० आणि सुपरमध्ये सुमारे ३० ते ५० शस्त्रक्रिया होतात. पण पहिल्याच दिवशी जवळपास ४० टक्के शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. केवळ तातडीच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.

निवासी वैद्यकीय डॉक्टरांनी सायंकाळी मेडिकलच्या अधिक्षक कार्यालयासमोर निषेध करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. शनिवारपासून आपत्कालीन सेवेत सहभागी असलेले निवासी डॉक्टरही काळ्या रंगाची टीशर्ट घालून निषेध व्यक्त करणार आहेत. सेंट्रल मार्डकडून सूचना येईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. (latest Marathi News)
- डॉ.शुभम महाल्ले, अध्यक्ष मार्ड, मेडिकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT