Nagpur MD traffickers 76 accused arrested MD worth 2 crore seized police drug case esakal
नागपूर

Nagpur : एमडी तस्करांसाठी नागपूर ‘कुरण’; ७६ आरोपी अटकेत : १६ महिन्यांत अडीच कोटींचे एमडी जप्त

तरुणाईमध्ये ‘नशा’ची क्रेझ वाढत आहे. यातून गेल्या दीड वर्षांत नागपुरात एम.डी.तस्करी वाढली असल्याचे चित्र

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तरुणाईमध्ये ‘नशा’ची क्रेझ वाढत आहे. यातून गेल्या दीड वर्षांत नागपुरात एम.डी.तस्करी वाढली असल्याचे चित्र आहे. शहरात मुंबईतून एमडीची तस्करी होत असून नागपूर ही मुंबईतील एमडी तस्करांसाठी उपयुक्त बाजारपेठ ठरत असल्याचे दिसत आहे.

गेल्या दीड वर्षात ४१ प्रकरणांमध्ये ३ किलोहून अधिक एम.डी. जप्त करण्यात आले असून ७६ गुन्हेगारांना अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरात मुंबई-पुण्याप्रमाणे नाईट कल्चर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

त्यातून पब, बारमध्ये तरुणाई दारूच्या नशेत झिंगताना दिसतात. दारूच्या नशेला जोड म्हणून अनेक तरुण अंमली पदार्थाचा आधार घेतात. त्यामध्ये गांजा, गर्द, चरस आणि एम.डी. चा समावेश होतो. गेल्यावर्षी अंमली पदार्थविरोधातील पथकाने केलेल्या कारवाईत ३० प्रकरणात ८० लाख ६६ हजार ४८० रुपयांचे ८३२ ग्रॅम ६३५ मिलीग्रॅम एमडी जप्त केले होते.

त्यात ५५ जणांना अटक केली होती. यावर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यादरम्यान ११ कारवाईमध्ये १ कोटी ९९ लाख २३ हजारांचे २ किलो ४ ग्रॅम एमडी जप्त कले. याशिवाय २१ आरोपींना अटक केली.

विशेष म्हणजे, त्यात वर्धा मार्गावरील मोठ्या कारवाईचा समावेश होता. या प्रकरणात आरोपींना अटक केल्यावर त्यांनी मुंबईवरून वर्धा मार्गाने ते नागपुरात ते आणल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे नागपूर आता ‘एमडी’ विक्रीसाठी तस्करांची बाजारपेठ होऊ लागली काय? असा प्रश्‍न निर्माण होतोय.

पोलिस आयुक्तांची मोहीम

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘ड्रग्ज फ्री सिटी’ करण्यासाठी कठोर पाऊले उचलली असून त्यासाठी विशेष अभियान राबविले आहेत. त्यातून ७६ तस्करांविरोधात कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, गांजा, गर्द, चरस, एमडी यावर फास आवळत २२१ आरोपींवर कारवाई केली आहे.

२०२२

अंमली पदार्थ - गुन्‍हे दाखल - वजन किंमत - अटक आरोपी

गांजा - १०३ - १६२८ किलो - २,४५,०५,३१४ - १५२

गर्द - ५ - २२ ग्रॅम - १,००,२०० - ७

चरस - ३ - ३६ ग्रॅम - २४,०५५ - ४

एमडी - ३० - ८३२ ग्रॅम - ८०,६६,४८० - ५५

२०२३

अंमली पदार्थ - गुन्‍हे दाखल - वजन किंमत - अटक आरोपी

गांजा - २० - ४०.५५३ कि.ग्रॅ. - ६,०४,३६५ - २१

गर्द - २ - १०. ७९ मिलिग्रॅम - २८,३७० - ४

चरस - ०० - ०० - ०० - ००

एमडी - ११ - २ किलो ४ ग्रॅम - १,९९,२३, - ४०० - २१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

SCROLL FOR NEXT