Nagpur Medical Hospital Sakal
नागपूर

Medical Hospital : भरती व्हायचंय... फॅन घरून आणा!

मेडिकलच्या वॉर्डात फेरफटका मारला असता, सीलिंग फॅन आहेत, परंतु या फॅनची हवा रुग्णांपर्यंत पोचत नाही.

केवल जीवनतारे

नागपूर - ज्याचे नाही कोणी त्याचे आहे मेडिकल अशी नागपुरातील गोरगरिबांची धारणा आहे. यामुळे दर दिवसाला तीन हजारावर रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे मेडिकलच्या विविध विभागांवर अवकळा पसरत आहे.

मेडिकलच्या वॉर्डात फेरफटका मारला असता, सीलिंग फॅन आहेत, परंतु या फॅनची हवा रुग्णांपर्यंत पोचत नाही. उकाडा सहन होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी चक्क घरून फॅन आणले होते. अनेक खाटांवर नातेवाइकांनी आणलेल्या फॅनची व्यवस्था केली असल्याचे दृश्य होते.

मेडिकलमध्ये कागदोपत्री अद्यापही १हजार ७०१ खाटा आहेत. मात्र ५२ वॉर्डांमध्ये सुमारे २ हजारावर खाटा आहेत. आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे हॉस्पिटल अशी ओळख मेडिकलची आहे. मध्यभारतात उत्तम दर्जाचे ट्रॉमा केअर युनिट साकारले आहे. सारेकाही आलबेल आहे इसे वरवर वाटत असले तरी रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.

वॉर्ड क्रमांक १७ मध्ये सकाळ प्रतिनिधीने भेट दिली असता, येथे सुमारे दहा ते बारा खाटांवर टेबल फॅन दिसून आले. मेडिकलमध्ये प्रत्येक वॉर्डात फॅन दिसतात, परंतु त्या फॅनची हवा हवेतच राहते. सुमारे हजारावर रुग्ण मेडिकलमध्ये दररोज दाखल असतात. यातील बऱ्याच रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णांसाठी फॅनची सोय करीत असल्याचे सांगत होते.

बेडशीटही घरूनच

रुग्णांच्या भरतीचे कार्ड बनल्यानंतर वॉर्डात भरती होण्यासाठी रुग्णाला आणल्यानंतर येथील गादीवर टाकण्यासाठी बेडशीट नसतात. अशावेळी रुग्णाचे नातेवाईक घरूनच बेडशीट आणतात. घरून आणलेली बेडशीट अनेक रुग्ण पुढे घेऊन जात नाही. येथेच पडून असतात. वॉर्ड क्रमांक १७ मध्ये अनेक खाटांवर टेबल फॅनसोबतच घरघुती बेडशीटही अंथरलेल्या होत्या.

अधिकारी ‘एसी’त रुग्ण उकाड्यात

अलीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. पण या रुग्णांना येथे उकाडा सहन करावा लागत आहे. एका नातेवाईकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे, ते म्हणाले, मेडिकलचे सारे अधिकारी एसीत असतात. वातानुकूलित हवा घेतात, मात्र रुग्णांना उकाडा सहन करावा लागतो. यामुळेच रुग्णांसाठी नातेवाईक घरूनच फॅन आणतात.

एका सिकलसेल बाधिताची खाट कोपऱ्यात होती. त्याच्यापर्यंत वॉर्डातील फॅनची हवाच पोचत नसल्याने गरीब रुग्णाला सम्राट अशोक बहुद्देशीय संस्थेचे अनिकेत कुत्तरमारे यांनी फॅन विकत घेऊन दिला होता. मेडिकलचे हे नवे रुप शासन आणि प्रशासनाला लाजवणारे आहे, हे मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT