नागपूर

Medicine Price Dropped: औषधांच्या महागाईचा ताप उतरला! ७० औषधांच्या किमतीवर नियंत्रण, केमोथेरपी लसीची किंमत झाली निम्मी

रक्तदाब, मधुमेह, कर्करोगासह अनेक जीवनावश्यक महागड्या औषधांच्या दराने मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना राष्ट्रीय औषध किंमत नियामकाने दिलासा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Price Dropped including Cancer Vaccine: रक्तदाब, मधुमेह, कर्करोगासह अनेक जीवनावश्यक महागड्या औषधांच्या दराने मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना राष्ट्रीय औषध किंमत नियामकाने दिलासा दिला आहे. मागील तीन महिन्यांत सुमारे ७० पेक्षा अधिक औषधांच्या किंमत कमी करण्यात आल्या आहेत. यात कर्करुग्णांच्या केमोथेरपीसाठी वापरल्या जाणाऱ्या लसीचाही समावेश आहे.

राष्ट्रीय औषध किंमत नियामकने (एनपीपीए) मधुमेह नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एका गोळीची किंमत २७.७५ रुपये निश्चित केली आहे. पूर्वी त्याची किंमत ३३ रुपये प्रतिगोळी होती. यासह, एनपीपीएने रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी टेलमिसार्टन आणि बिसोप्रोलॉल फुमर या औषधाच्या एका गोळीची किंमत १०.९२ रुपये केली आहे. त्याची पूर्वीची किंमत १४ रुपयांपर्यंत होती. (Latest Marathi news)

राष्ट्रीय औषध किंमत नियामकने कर्करुग्णांच्या केमोथेरपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसीची किंमत १०३४.५१ रुपये निश्चित केली आहे. त्याची किंमत पूर्वी दुप्पट होती. तसेच वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसीचे दर वेगळे आहेत. तसेच नियामक मंडळाने एपिलेप्सी आणि न्यूट्रोपेनियाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांसह ८० शेड्यूल्ड औषधांच्या कमाल मर्यादा किमतीतही सुधारणा केली आहे.

कोरोनानंतर लोकांच्या औषध आणि वैद्यकीय खर्चात वाढ झाली आहे. परंतु, सरकारने काही आजारांवरील औषधांच्या किमती कमी केलेल्या आहेत. औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठीच केंद्र सरकारने ३९ फॉर्म्यूलेशनच्या किमती निश्चित केल्या आहेत. (Latest Marathi news)

रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग या महत्त्वाच्या अतिवापर असलेल्या आजारावरील औषधांच्या किमतीत घट करण्यात आलेली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दरात घसरण झालेली असून आतापर्यंत ३० टक्क्यापर्यंत सर्वच औषधांच्या किमती कमी झालेल्या आहेत.- विक्रम वोरा, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन (नागपूर झोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT