Nagpur midnight two hours torrential rains power supply cut
Nagpur midnight two hours torrential rains power supply cut sakal
नागपूर

नागपूर : वादळी पावसाने उडविली झोप

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरकर गाढ झोपेत मध्यरात्री अचानक विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगर्जनेसह वादळी पावसाने उपराजधानीला जोरदार तडाखा दिला. जवळपास दीड ते दोन तास बरसलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागपूरकरांची झोपच उडविली.

दिवसभर ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ चालल्यानंतर रात्री बारानंतर अचानक आभाळ भरून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली. जवळपास दीड ते दोन तास शहरातील अनेक भागांत विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह वरुणराजा दणक्यात बरसला. कानठळ्या बसविणाऱ्या व ह्रदयात धडकी भरविणाऱ्या विजांमुळे अनेक जण झोपेतून जागे झाले.

बराच वेळपर्यंत नागपूरच्या आकाशात विजांचे तांडव चालले. वादळामुळे अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. झोपमोड झाल्याने व बराच वेळपर्यंत अंधारात राहावे लागल्याने नागरिकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. अखेर दोन वाजताच्या सुमारास वादळ व विजांचा कडकडाट बंद झाल्यानंतर वीज आली आणि नागपूरकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. रस्त्यांवरूनही पाणी वाहिले. वादळामुळे सिव्हिल लाइन्स व नरेंद्रनगरसह अनेक भागांत झाडे व फांद्याही पडल्याचे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. पावसामुळे वातावरण गार झाल्याने किमान तापमानातही मोठी घट झाली. नागपूरचा पारा साडेसहा अंशांनी कमी होऊन २४.९ वर आला. कमाल तापमानही तीन अंशांनी घसरून ३९ अंशांवर स्थिरावले.

ग्रामीण भागांतील रामटेक, सावनेर, उमरेड, नरखेड, काटोल, कोंढाळी येथेही दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय विदर्भातील ब्रम्हपुरी, वर्धा व अन्य जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. ब्रम्हपुरीत सकाळी साडेआठपर्यंत २१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारीही काही जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT