court sakal
नागपूर

Nagpur : कुलगुरू डॉ. चौधरींवर माफी मागण्याची नामुष्की

उच्च न्यायालयाचे ताशेरे : डॉ. मोहन काशीकरांवर कारवाईप्रकरणी सुनावले खडेबोल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. मोहन काशीकर यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना चांगलेच धारेवर धरले. यामुळे, डॉ. सुभाष चौधरी यांना भर न्यायालयात माफी मागण्याची वेळ आली. तसेच, भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, असेही न्यायालयाला आश्वासन दिले.

कुलगुरूंनी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मोहन काशीकर यांची कार्यालयीन चौकशी लावण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला डॉ. काशीकर यांनी नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली.

यापूर्वी, न्यायालयाने डॉ. काशीकरांविरोधातील कुलगुरूंच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली होती व दोन्ही पक्षांनी आपसी समझोत्याने प्रकरण सोडवावे, असे आदेशात यापूर्वी नमूद केले होते. मात्र, त्यानंतरही कुलगुरूंनी डॉ. काशीकरांना पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावली.

त्यामुळे डॉ. काशीकर यांनी नागपूर खंडपीठात दुसरी याचिका दाखल केली. या प्रकरणांवर बुधवारी संयुक्तपणे कुलगुरू डॉ. चौधरींवर माफी मागण्याची नामुष्की सुनावणी घेण्यात आली. डॉ. काशीकर यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केल्याप्रकरणी कुलगुरू डॉ. चौधरी यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले.

तसेच त्यांची वेतनवाढ तत्काळ सात टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेच विद्यापीठ प्रशासनाने डॉ. काशीकर यांचे वेतनवाढ स्थगितीचे आदेश मागे घेतले. तर न्यायालयाने डॉ. काशीकरांना त्यांचे विभागप्रमुखाचे पद परत देण्याचेही आदेश दिले. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्यांना भर न्यायालयात माफी मागण्याची नामुष्कीही यावेळी ओढविली. न्यायालयाने त्यांना या प्रकरणात माफी मागण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी, तर नागपूर विद्यापीठातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.

कुलगुरूंना पायउतार करा

याचिकाकर्त्यातर्फे कुलगुरू आपल्या पदाचा दुरुपयोग करीत असल्याने त्यांना पायउतार करण्याची विनंती उच्च न्यायालयाला करण्यात आली. मात्र, हे अधिकार न्यायालयाच्या अखत्यारित येत नसून यासाठी राज्यपालांकडे निवेदन करण्याची मुभा याचिकाकर्त्याला दिली.

काय आहे प्रकरण?

डॉ. काशीकर यांच्या याचिकेनुसार कुलगुरू डॉ. चौधरी यांनी विद्यापीठाच्या कँम्पसमधील पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या (पीजीटीडी) कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांना सोपविला. मात्र, डॉ. काशीकर यांनी खासगी कारण देत ही जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. कुलगुरूंनी नाराज होत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

दोनवेळा उत्तर दाखल करूनही कुलगुरूंचे त्यावर समाधान झाले नाही. त्यामुळे, राज्यशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख पदावरून त्यांना हटविण्यात आले. तसेच, एक वर्षाची वेतनवाढसुद्धा स्थगित करण्यात आली. या निर्णयाला डॉ. काशीकर यांनी नागपूर खंडपीठामध्ये आवाहन देत कुलगुरूंनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप केला. येथून हा वाद सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT