MSEB Electricity
MSEB Electricity  sakal
नागपूर

अकराशे जि. प. शाळांकडे ८९ लाखांचे बिल थकीत

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील एक हजार १७८ शाळांकडे वीजबिलाचे ८९ लाख रुपये थकीत आहेत. या कारणाने महावितरणने ३९२ शाळांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित केला होता. शासनस्तरावर वीजबिलाबाबत निर्णय झाल्याने वीजपुरवठा खंडित केलेल्या शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

महावितरणने वाढलेली थकबाकी कमी करण्यासाठी वसुली मोहीम सुरू केली आहे. शासकीय कार्यालयाकडील वीजबिल वसुली केली जात आहे. शासकीय कार्यालयांना थकीत वीजबिलांचा भरणा करण्याची नोटीस महावितरणने यापूर्वीच दिली होती. यानंतरही अनेक कार्यालयांनी बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे आता वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील एक हजार १७८ शाळांकडे ८९ लाख रुपयांचे वीजबिल थकीत होते. यात पांढरकवडा विभागातील ३१८ शाळा असून त्यांचे २६ लाख ४८ हजार २३९ वीजबिल थकीत आहे. पुसद विभाग ४७९ शाळांकडे ३३ लाख १६ हजार ३४६ तर यवतमाळ विभागातील ३८१ शाळांचे २९ लाख ६२ हजार ९३६ वीजबिल थकीत आहे.

टीकेची झोड उठल्यानंतर महावितरणने तात्पुरता खंडित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा सुरळीत केला. जिल्ह्यातील खंडित असलेला वीजपुरवठा जोडून देण्यात आलेल्या ३९२ शाळांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे १५५ शाळा या महावितरण यवतमाळ विभागातील आहेत. १४० शाळा या पुसद विभागातील असून पांढरकवडा विभागातील ९७ शाळांचा समावेश आहे.

५४ लाख रुपयांची होती थकबाकी

महावितरणकडून विजेचे वितरण करताना वापरलेल्या विजेचे बिल न भरणाऱ्या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील महावितरणची वीजजोडणी असलेल्या ६३४ पैकी ३९२ जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा ५४ लाखांच्या थकबाकीसाठी तात्पुरता खंडित करण्यात आला होता. जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT