नागपूर

Nagpur: एसटी बस पुलावरून कोसळताना बचावली..! भिकूंड नदीच्या पुलावरील घटना; बुलडाणा येथून मोर्शीकडे सुरू होता प्रवास

सायंकाळी सव्वाचार वाजताची वेळ... प्रवाशांनी भरलेली एसटी कठडे नसलेल्या अरुंद पुलावर पोहोचली अन् प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला..

सकाळ डिजिटल टीम

MSRTC Bus Saved From Accident : सायंकाळी सव्वाचार वाजताची वेळ... प्रवाशांनी भरलेली एसटी कठडे नसलेल्या अरुंद पुलावर पोहोचली अन् प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.. अचानक समोरून ट्रक आल्याने बसच्या चालकाने ब्रेक लावला...बस पुलावरून कोसळताना थोडक्यात बचावली अन् प्रवाशांचा जीव भांड्यात पडला... हा थरार बाळापूर नजीकच्या भिकूंड नदीच्या पुलावर बुलडाणा-मोर्शी बसमधील प्रवाशांनी शुक्रवारी अनुभवला.

मोर्शी (जि.अमरावती) आगाराची एमएच ४० ए क्यू ६४६० क्रमांकाची बस बुलडाणा येथून मोर्शीकडे प्रवाशी घेऊन निघाली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील बसस्थानकावर प्रवाशाची चढ - उतार झाल्यानंतर बस अकोल्याकडे मार्गस्थ झाली.

दरम्यान बस भिकूंड नदी अरुंद पुलावर पोहोचताच समोरून भरधाव ट्रक पुलावर आला. धोका बघून बस चालकाने अचानक ब्रेक लावले. कठडे नसलेल्या पुलावर घडलेल्या या प्रसंगात बस चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे बस पुलावरून कोसळताना थोडक्यात बचावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर दोन्ही वाहने पुलावर अडकल्याने काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT