Nagpur news esakal
नागपूर

Nagpur : महापालिकेची स्वच्छता मोहीम जोमात,तीन दिवसांत तीन लाखांचा दंड वसूल

हातठेले, भाजी विक्रेत्यांकडून सर्वाधिक अस्वच्छता

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्वच्छता मानांकनात घसरण झाल्यानंतर स्वच्छतेसाठी जाग आलेल्या महापालिकेने गेल्या तीन दिवसांत तीन लाख रुपयांचा दंड वसूल केला. स्वच्छतेसाठी मोहीम आक्रमक करणाऱ्या महापालिकेला हातठेले, भाजी विक्रेत्यांनी लगतच्या परिसरात सर्वाधिक अस्वच्छता केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून आज सर्वाधिक ४२ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर ११ ऑक्टोबरपासून दंडात्मक कारवाई सुरू केली. ११ ऑक्टोबर रोजी कारवाईच्या पहिल्या दिवशी ८४ हजार ५०० रुपये, काल, बुधवारी ३६५ प्रकरणात १ लाख २ हजार १०० रुपये तर आज ३५५ प्रकरणात १ लाख ९ हजार १०० रुपये, असा एकूण ९५३ प्रकरणात २ लाख ९५ हजार ७०० रुपयांचा दंड उपद्रव शोध पथकाने वसूल केला.

उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी आज रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर २९ प्रकरणांची नोंद करून ११ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्वांवर प्रत्येकी ४०० रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या १०१ व्यक्तींवर प्रत्येकी १०० असा १० हजार १०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सर्वाधिक अस्वच्छता हातठेले, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, भाजी विक्रेत्यांच्या परिसरात आढळून आल्या. अशा १०७ जणांवर ४०० रुपये प्रमाणे ४२ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय इतर संस्थांकडून १००० रुपयांप्रमाणे १९ प्रकरणात १९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाच्या दहाही झोनच्या प्रमुखांनी कारवाई केली.

उघड्यावर लघुशंकेवर नियंत्रण

शहरात कुठेही लघुशंका करणाऱ्यांची कमी नाही. उघड्यावर लघुशंकेसाठी पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. आज उघड्यावर लघुशंकेचे एकही प्रकरणाची नोंद नाही. याशिवाय दवाखाने, इस्पितळ, पॅथलॅबकडूनही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यात नियंत्रण आले आहे. आज याबाबतही प्रकरणाची नोंद करण्यात आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT