Nagpur Municipal corporation employees strike 
नागपूर

Nagpur : मनपा कर्मचारी करणार कामबंद आंदोलन

प्रशासनाकडून साखळी उपोषण बेदखल : चर्चेसाठी न बोलावल्याने संताप

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सातव्या वेतन आयोगाची १६ महिन्यांची थकबाकीसह इतर मागण्यांसाठी साखळी उपोषण करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आता कामबंद आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांनी उपोषणानंतर झालेल्या सभेत कामबंद आंदोलनाचा निर्धार जाहीर केला.

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची १६ महिन्यांची थकबाकी देण्याचे मंजूर आहे. १५ विविध विभागातील कर्मचाऱ्यांना थकबाकीचा पहिला हफ्ता देण्यात आला. परंतु आयुक्तांनी थकबाकी न देण्याबाबत वित्त विभागाला आदेश दिल्याने कर्मचारी व शिक्षकांच्या रोषातून नुकताच १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान संविधान चौकात साखळी उपोषण करण्यात आले. परंतु उपोषणाची व कर्मचाऱ्यांच्या मागणीची आयुक्तांनी दखलही घेतली नाही.

त्यामुळे कर्मचाऱ्यांत रोष आणखी वाढला आहे. साखळी उपोषणाला मनपा सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक संघटनेचे भीमराव मेश्राम, शिक्षक संघटनेचे देवराव मांडवकर, राष्ट्रीय कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे महासचिव रंजन नलोडे, लोकक्रांती पॅनलचे राजकुमार कनाडे, ईश्वर मेश्राम, प्रवीण तंत्रपाळे, अरुण तुर्केल, धर्मदास मेश्राम आदी बसले होते.

त्यांनी उपोषणानंतर सभेत महापालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. उपोषणासाठी संजय मोहळे, बाबा श्रीखंडे, मिलिंद चकोले, गौतम गेडाम, अभय अप्पनवार, हेमराज शिंदेकर, बळिराम शेंडे, योगेश बोरकर, संजय गाटकिने, विश्वास सेलुसुरकर, सतीश जनवारे, मनीष दुधमोगरे आदींनी प्रयत्न केले.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • १६ महिन्यांची थकबाकी त्वरित द्यावी

  • सातव्या वेतन आयोगानुसार ३ लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे

  • कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्तांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा

  • ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करताना २० वर्षांची अट रद्द करावी

  • सुधारित वाहतूक भत्ता लागू करावा

  • रिक्त जागा पदोन्नतीने भराव्यात

  • मनपा कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावे

  • श्रम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

Mumbaicha Raja: 'मुंबईच्या राजाचं' ऐतिहासिक विसर्जन होणार; मुर्ती अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट पाण्यात उतरवणार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

Vastu Tips: घरात पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत अन् कुठे लावू नयेत? पाहा वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे नियम!

SCROLL FOR NEXT