Nagpur muncipal Corporation sakal
नागपूर

नागपूर : महिलांसाठी ओबीसीच्या १८ जागा होणार आरक्षित

अनेकांचे गणित बिघडणार?, सर्वसाधारण प्रवर्गातून काढणार आरक्षण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने सर्व निवडणूक ओबीसी आरक्षणासह घेण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेत महिलांसाठी राखीव सर्वसाधारण गटातील १८ जागा ओबीसी महिलांसाठी राखीव राहणार आहेत. याशिवाय खुल्या गटातून १७ जागा ओबीसींसाठी राहणार आहेत. त्यामुळे अनेकांची गणिते बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवायच आरक्षण काढत निवडणुकीची प्रक्रिया केली होती. त्यानुसार महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गात ५६ तर खुल्या सर्वसाधारण प्रवर्गात ५७ जागा राखीव होत्या. त्यानुसार अनेकांनी अनुकूल गणिते मांडण्यास सुरुवात केली होती. आता ओबीसी आरक्षण खुल्या प्रवर्गातील जागातूनच काढण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच गणित जुळविणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. आता ओबीसींसाठी महापालिकेला ३५ जागा आरक्षित कराव्या लागणार आहेत. महापालिका निवडणुकीत महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील १८ जागा ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

उत्तर नागपुरात बदलावे लागतील प्रभाग

महापालिकेत उत्तर नागपुरातील अनुसूचित जातीचेही अनेकजण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढतात. यातील जागा ओबीसींसाठी राखीव झाल्यास त्यांच्यापुढे प्रभाग बदलण्याचीच स्थिती निर्माण होणार आहे. काही प्रभागात महिलांच्या दोन जागांपैकी एक अनुसूचित जाती तर एक सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. याशिवाय पुरुषांना सर्वसाधारण खुल्या गटातून निवडणूक लढण्याची संधी होती. परंतु, आता खुल्या सर्वसाधारण गटातील १७ जागा ओबीसींसाठी आरक्षित होणार आहेत.

प्रभागरचना बदलण्याबाबतही चर्चा

सध्या तीन सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार आरक्षण काढण्यात आले आहे. ओबीसींचे आरक्षणही याचनुसार काढणे अपेक्षित आहे. परंतु, नवे सरकार आल्याने काहींनी चार सदस्यीय प्रभागाची चर्चा सुरू केली. चार सदस्यीय प्रभागाचा निर्णय झाल्यास निवडणूक आयोगाला प्रभागाचे सिमांकन, आरक्षण सारेच नव्याने करावे लागणार आहे. महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांतही ही चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT