Municipal Election sakal
नागपूर

नागपूर महापालिका निवडणूक : पाच सर्वेक्षणातून निवडणार भाजप उमेदवार

लोकांच्या पसंतीच्या उमेदवाराची निवड केली जाणार

राजेश चरपे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेचे उमेदवार निवडण्यासाठी भाजपच्यावतीने एकूण पाच सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. यातून लोकांच्या पसंतीच्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यांपैकी दोन पक्षातर्फे तर तीन सर्वेक्षण एका बड्या नेत्याच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे समजते.

नागपूर महापालिकेची निवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. पाच फेब्रुवारीला विद्यमान सत्ताधाऱ्यांचा कालावधी संपत आहे. यावेळी चार ऐवजी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मोठी काटछाट प्रभागांची झाली आहे.

मागील निवडणुकीत दीडशेंपैकी भाजपचे १०८ उमेदवार निवडून आले होते. यापैकी अनेक नगरसेवक पाचही वर्षे निष्क्रिय राहिले. त्यामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी निष्क्रिय उमेदवारांना घरी बसविणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसे संकेतही भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी दिले होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीत फटका बसू नये याकरिता भाजपच्या नेत्यांनी सारवासारव केली होती. उमेदवारी वाटपाचे अधिकारी आमदारांना नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र सोबतच जो जनतेमध्ये असेल त्यालाच उमेदवारी देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

शहरातील प्रभागाचा आराखडा जाहीर होताच सर्वेक्षणाला सुरुवात केली जाणार आहे. जो जनतेमध्ये राहील त्यालाच उमेदवारी हे धोरण प्रामाणिकपणे अवलंबल्यास भाजपला सुमारे तीस ते चाळीस विद्यमान नगरसेवकांनी घरी बसवावे लागणार आहे. पक्षाने धोरण जाहीर केल्यानंतर अनेकांचा आता जनतेत मिसळण्याचा खटाटोप सुरू झाला आहे. मात्र, पाच वर्षांत तुम्ही काय केले याच अहवाल सादर करण्यास सर्व नगरसेवकांना सांगण्यात आले आहे. अहवाल तयार करण्यासाठी सध्या नगरसेवकांची चांगलीच धावपळ सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT