Nagpur municipal corporation  
नागपूर

नागपूर : ‘ओपन’ च्या जागा कमी होणार

मनपा निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण : सोडतीचा दुसरा अंक आज

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण कायम ठेवून उद्या, शुक्रवारी ओबीसी महिला व खुल्या गटासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. ओबीसींचे आरक्षण सर्वसाधारण महिला व खुल्या प्रवर्गातून काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गाच्या यापूर्वी आरक्षित केलेल्या जागांमध्ये घट होणार आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊन हॉलमध्ये ओबीसी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व निवडणूक ओबीसी आरक्षणासह घेण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेत महिलांसाठी राखीव सर्वसाधारण गटातील १८ जागा ओबीसी महिलांसाठी राखीव राहणार आहेत. याशिवाय खुल्या गटातून १७ जागा ओबीसींसाठी राहणार आहेत. निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवायच आरक्षण काढत निवडणुकीची प्रक्रिया केली होती.

त्यानुसार महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गात ५६ तर खुल्या सर्वसाधारण प्रवर्गात ५७ जागा राखीव होत्या. त्यानुसार अनेकांनी अनुकूल गणिते मांडण्यास सुरुवात केली होती. आता ओबीसी आरक्षण खुल्या प्रवर्गातील जागांतूनच काढण्यात येणार आहे. आता ओबीसींसाठी महापालिकेला ३५ जागा आरक्षित कराव्या लागणार आहेत. महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील १८ जागा ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील १७ जागा ओबीसींसाठी राखीव राहतील. त्यामुळे महिलांचा सर्वसाधारण गटाच्या ३८ जागा तर खुल्या सर्वसाधारण प्रवर्गाच्या ४० जागा शिल्लक राहणार आहेत.

ओबीसी आरक्षणाबाबत आयोगाचा कार्यक्रम

  • २९ जुलै : ओबीसी आरक्षणासाठी सोडत

  • ३० जुलै : प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे

  • ३० जुलै ते २ ऑगस्ट : आरक्षणावर हरकती व सूचना

  • ५ ऑगस्ट : अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT