Nagpur municipal Six schools no nutrition food supply 
नागपूर

नागपूर : सहा शाळांमध्ये पोषण आहार पुरवठा नाही

निविदा प्रक्रियेस विलंब : विद्यार्थी वंचित

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महानगरपालिकेच्या शाळा सुरू होऊन दोन दिवसांचा कालावधी लोटला असताना अद्याप पोषण आहार पुरवठ्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे मनपा हद्दीतील सहा शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना आहाराला मुकावे लागले. विद्यार्थ्यांना आहार कधी मिळेल, हे सांगायला विभाग तयार नाही. मर्जीतील लोकांना काम देण्यासाठी प्रक्रिया लांबविण्यात येत असल्याची चर्चा आहे.

शाळांची वेळ बदलल्याने हा आहार मिळाला नसल्याचे सांगण्यात येत असले तरी पोषण आहार अधिक्षक गेडाम यांच्यामुळे निविदा प्रक्रिया लांबल्याचा आरोप होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शहरातील ७४४ शाळांना शिजविलेला आहार सेंट्रल किचन पद्धतीने पुरविण्यासाठी निविदा आमंत्रित करण्यात आल्या होत्या. परंतु, मर्जीतील पुरवठादारांना कंत्राट देण्यासाठी अधीक्षक गेडाम यांनी मर्जी राखल्याने या सर्व प्रक्रियेला वेळ लागत आहे.

नियमानुसार पुरवठ्याचे कंत्राट शाळा सुरू होण्यापूर्वीच मिळायला पाहिजे होते. ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याने जुन्याच पुरवठादारांना १५ दिवसांची अल्पमुदत वाढवून देण्यात आली. वेळेत निविदा प्रक्रिया झाली असती तर शेकडो विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी आहार मिळाला असता. विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित राहावे लागत असल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

जिल्ह्यात चार शाळांत आहार नाही

जिल्हा परिषद व खासगी अनुदानित, विनाअनुदानित दोन हजार ४४ शाळांत पोषण आहार शिजविला जातो. बहुतांश, शाळेत पहिल्याच दिवशी आहार मिळाला. चार शाळांमध्ये हा आहार मिळाला नाही. दोन शाळांमध्ये विद्यार्थी नसल्याने तर दोन शाळांमध्ये स्वयंपाकीण हजर नसल्याने आहार मिळू शकला नसल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT