Bio Medical Waste sakal
नागपूर

Bio Medical Waste : जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीवर नागपूर मनपाचा ‘वॉच’

भारत सरकारकडून बायो मेडिकल वेस्ट (मॅनेजमेंट अँड हॅण्डलिंग) नियम १९९८ तसेच बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६ तयार करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

भारत सरकारकडून बायो मेडिकल वेस्ट (मॅनेजमेंट अँड हॅण्डलिंग) नियम १९९८ तसेच बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६ तयार करण्यात आले आहेत.

नागपूर - जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जावी, घरातील कचरा व जैव वैद्यकीय कचरा मिश्रित होणार नाही याची काळजी तसेच यासंदर्भातील नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर आता महानगरपालिकेची करडी नजर राहणार आहे. याकरिता नागपूर मनपाने झोननिहाय पथक तयार केले आहेत.

भारत सरकारकडून बायो मेडिकल वेस्ट (मॅनेजमेंट अँड हॅण्डलिंग) नियम १९९८ तसेच बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६ तयार करण्यात आले आहेत. परंतु, काही वैद्यकीय संस्था या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. जैव वैद्यकीय कचऱ्याचे विलगीकरण करीत नसल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. बायो मेडिकल वेस्ट पर्यावरणासाठी घातक आहे.

अशा प्रकारच्या कचऱ्यामुळे पर्यावरणास हानी होणार नाही, याची दक्षता घेणे प्रत्येक कचरा निर्मात्याची जबाबदारी आहे. काही वैद्यकीय संस्थांकडून जैव वैद्यकीय कचऱ्याचे विलगीकरण शास्त्रोक्त वर्गीकरणानुसार होत नसून सदर कचरा घनकचऱ्यामध्ये मिसळला जातो, असे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले.

संबधित संस्थेकडून जैव वैद्यकीय कचरा व सर्वसाधारण कचरा वर्गीकृत स्वरूपात जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता कचरा संकलन एजन्सीला देणे आवश्यक आहे त्यामुळे, सदर वैद्यकीय संस्थांकडून कचरा मिश्रित होणार नाही याकरिता महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता झोन निहाय पथक तयार केले आहे.

आठवड्याला अहवाल द्यावा लागणार

नागपूर महानगरपालिकेने तयार केलेल्या झोन निहाय पथकामध्ये झोन क्र. १ ते १० साठी झोनल वैद्यकीय अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले वैद्यकीय अधिकारी, झोन क्र. १ ते १० साठी मुख्य स्वच्छता अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी, नागपूर विभागाकरिता क्षेत्रीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, झोन क्र. १ ते १० करिता झोनल उपद्रव शोध पथक प्रमुख यांचा समावेश राहील.

महानगरपालिकेद्वारे तयार करण्यात आलेले झोन निहाय पथक वैद्यकीय संस्थेमध्ये संग्रहित केलेल्या कचऱ्याचे निरीक्षण करेल. दरम्यान आढळून आलेल्या बाबींची नोंद करून सदर अहवाल दर आठवड्याला मुख्यालयात सादर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT