Nagpur newborn baby sale case three women in custody sakal
नागपूर

Nagpur: पंधरा दिवसांच्या बाळाची परस्पर विक्री

प्रसुती होताच तिच्या पंधरा दिवसाच्या बाळाची विक्री करणाऱ्या रेखा आप्पासो पुजारी (वय ५४) आणि मुन्नीबाई द्वारकाप्रसाद लिलारे (वय ४८, दोघी रा. निर्मल कॉलनी, जरीपटका) यांच्या विरोधात बुधवारी (ता.५) जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर- बाळविक्रीचे रॅकेट दिवसेंदिवस मोठे स्वरुप धारण करीत असून आणखी एका बाळ विक्री प्रकरणाचा खुलासा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने केला. एका महिलेला प्रसुतीसाठी आपल्याजवळ ठेऊन घेत,

प्रसुती होताच तिच्या पंधरा दिवसाच्या बाळाची विक्री करणाऱ्या रेखा आप्पासो पुजारी (वय ५४) आणि मुन्नीबाई द्वारकाप्रसाद लिलारे (वय ४८, दोघी रा. निर्मल कॉलनी, जरीपटका) यांच्या विरोधात बुधवारी (ता.५) जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघींवरही कोराडी पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल असून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाघाट येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचे २०१२ तेथील युवकासोबत लग्न झाले. त्यातून तिला दोन तीन अपत्ये झाली. मात्र, २०१८ मध्ये कर्करोगाने महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे ती गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत नातेवाइकाकडे राहायला आली. कधीकधी ती सासरीही जात असे.

दरम्यान २०२१ साली ती बालाघाट येथे गेली असता, एका कार्यक्रमात तिला ओळखीचा युवक भेटला. त्याने बोलण्याच्या बहाण्याने तिला जंगलात नेत अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास युवकाने तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने घडलेला प्रकार दडवून ठेवला. काही दिवसांनी महिला नागपुरात परतली असता,

तीला गर्भवती असल्याचे कळाले. त्यामुळे ही माहिती तिच्या नातेवाईकांना कळवित झालेल्या प्रकाराची माहिती दिली. याचदरम्यान महिलेची मुन्नीबाईसोबत ओळख झाली. त्यातून महिला गर्भवती असल्याचे तिला कळाले. मुन्नीबाने तिला विचारणा केली. बाळ ठेऊ शकत नसल्याचे सांगितले. मुन्नीबाईने तिला धीर दिला.

बाळाला जन्म दे बाकी मी बघून घेईल, असे मुन्नीबाईने महिलेला सांगितले. त्यानंतर मुन्नीबाईने महिलेला जरिपटका येथील रेखा पुजारीच्या घरी ठेवले. सुरूवातीला दोन खासगी हॉस्पिटलमध्ये महिलेची नियमित तपासणी केली.

खासगी हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी अधिक खर्च येईल, असे सांगून दोघींनी महिलेला आधी डागा आणि नंतर मेयोमध्ये नेत २ मारत २०२२ ला प्रसुती करवून घेतली. त्यानंतर जन्मलेल्या बाळासह तीन दिवसानंतर महिलेला सुटी झाली.

तेव्हा रेखा महिला व तिच्या बाळाला घेऊन परत घरी आली. २१ मार्चला बाळाला तपासणीसाठी मेयो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने दोघी केवळ बाळाला घेऊन जात बाळाची विक्री केली. घरी परतल्यावर महिलेने बाळाबाबत विचारणा केली. मात्र, बाळाची विक्री केल्याचे सांगून कोणाला सांगितला दोघींनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेला नातेवाइकांच्या स्वाधीन केले.

यापूर्वी कोराडी येथील महिलेच्या बाळाच्या विक्री प्रकरणात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने त्यांना ताब्यात घेतल्यावर चौकशी केली असता, मुन्नीबाईने या गुन्ह्याबाबत माहिती दिली, तेव्हा या प्रकरणाचे बिंग फुटले.

दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बाळाचा शोध सुरू केला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) एम. सुदर्शन, सहायक पोलिस आयुक्त सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ आणि पथकाने केली.

बाळ विक्री प्रकरणात १५ वा गुन्हा

बाळ विक्री प्रकरणातील मास्टरमाईन्ड असलेली श्‍वेता उर्फ आयेशा खान हिच्या टोळीने बऱ्याच बाळांची विक्री केली आहे. गेल्या महिन्यात पथकाने श्‍वेता खान आणि रेखा पुजारी यांच्या विरुद्ध कोराडीतील महिलेच्या बाळाच्या विक्रीबाबत गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान आतापर्यंत श्‍वेता खान, सचिन पाटील, मकबुल खान, आणि डॉक्टरसह तिच्या अन्य साथीदारांकडून १५ बाळांच्या विक्रीची प्रकरणे समोर आली असून त्यावरून पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यात १५ गुन्ह्यांची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT