Jayant Patil Ajit Pawar esakal
नागपूर

Nagpur : आज अजित पवार, जयंत पाटील नागपूरात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय ओबीसी शिबिरासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय ओबीसी शिबिरासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शनिवारी नागपूरला येत आहेत. रेशीमबागेतील महात्मा फुले सभागृहात तीन आणि चार जूनला हे शिबिर होऊ घातले आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.३) शिबिराचे उद्‍घाटन होणार असून समारोप आज अजित पवार, जयंत पाटील येणार शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. शिबिरात राज्यभरातून सुमारे सातशे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल,

ओबीसीचे राष्ट्रीय नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे आदीही शिबिरात उपस्थिती लावणार आहेत. शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, आमदार अमोल मिटकरी, ॲड. अंजली साळवे, धनगर युवा नेत्या सक्षणा सलगर, विकास लवांडे, अविनाश काकडे हे ओबीसींच्या विविध विषयांवर व सध्याच्या घडामोडींवर मार्गदर्शन करणार आहेत.

अजित पवार आणि जयंत पाटील सकाळी साडेआठ वाजता नागपूर विमानतळावर दाखल होणार आहेत. येथून दोन्ही नेते चंद्रपूरला जाऊन दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तेथून परत नागपूरला आल्यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास ओबीसी शिबिराच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT