Nagpur Criminals Parade by CP Ravindra Singal: शहरात नवे पोलिस आयुक्त आले असताना, गुन्हेगार पुन्हा सक्रीय होताना दिसून येत आहेत. मात्र, नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी बुधवारी (ता.७) दुपारी शहरातील १३७ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आयुक्तालयात बोलावून यानंतर ‘सिंगल’ही गुन्हा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी दिली.
पोलिस आयुक्त डॉ. सिंगल हे रूजू होताच, दुहेरी खून आणि इतर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. शहरात वाढणाऱ्या घटना आणि पुन्हा गुन्हेगार सक्रीय होत असल्याने त्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मकोका, खून, हल्ला करणे लुटपाट, एनडीपीएस यांच्यासह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रीय असलेल्या गुन्हेगारांना आयुक्तालयात ओळख परेडसाठी बोलाविण्यात आले.
दुपारी पोलिस आयुक्तांनी त्यांचेशी व्यक्तीश बोलून त्यांना यापुढे एकही गुन्हा घडल्यास त्यांची खैर नसल्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे, रवींद्र सिंगल यांनी गुन्हेगारांची सविस्तर माहिती घेतली. गुन्हेगारांना त्यांची सद्य परिस्थीती त्यांचा काम धंदा, या बाबत विचारपूस केली.(Latest Marathi News)
६५ टक्के खून, प्राणघातक हल्ल्यातील
नागपुरात गेल्या पाच दिवसात चार खून झाले. खुनाच्या घटना शहरात वाढले असून पोलिस आयुक्तालयातील ओळख परेडमध्ये ६५ टक्के आरोपी खून आणि प्राणघातक हल्ल्यातील होते. त्यांनाही पोलिस आयुक्तांनी चांगलीच तंबी देत फटकारले.
अवैध सावकारीवर टाच
शहरात अवैध सावकारीतून अनेक गुन्हे घडत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी मोहिम सुरू करण्याचे निर्देश दिले. शिवाय कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. (Latest Marathi News)
हे होते आरोपी
पोलिस मुख्यालयात बोलाविण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये कुख्यात अश्विन रामासे (जरीपटका), रवींद्र उईके (जरीपटका), राहुल खोब्रागडे (जरीपटका), अंकीत फुके (बर्डी), अब्दुल करीम शेख (मानकापूर), राकेश हेडाऊ (तहसिल), सीतारा शाहु (शांतीनगर), सनी समुद्रे (लकडगंज), सनी चव्हाण (ईमामवाडा), मयुर फुले (ईमामवाडा), रोहीत नंदनवार(पारडी), सौरभ कडु (प्रतापनगर), ऋषी कुट्टेवार (सोमवारी क्वार्टर), जाकरी खान नाजीर खान (सक्करदरा), अनिकेत काळे (सक्करदरा), मुकेश काटोले, दानिश वसीम खान, हर्षल उर्फ पिंडा पवार, मुकेश हेडाऊ, सौरभ वासनिक (पाचपावली) यांच्यासह अनेक कुख्यात गुंडही यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.