महावितरण
महावितरण  sakal
नागपूर

Nagpur news : विजेच्या लपंडावाने नागपूरकरांच्या झोपेचे ‘खोबरे’

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वादळी वाऱ्यासह गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाळामुळे शहरातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. संध्याकाळी गेलेली वीज दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आली नसल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली.

उकाड्याच्या या दिवसात नागरिकांचे चांगलेच हाल झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्नात होते. दरम्यान, अजनी परिसरातील नागरिकांचा जमाव अजनी उपकेंद्रात घुसल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. वादळी पावसामुळे ५० ठिकाणी झाडांच्या फांद्या, बॅनरचे कापड वीज वाहिन्यांवर कोसळल्याने वीज तारा तुटून वीज पुरवठा विस्कळित झाला होता. नरेंद्र नगर व अजनी परिसरातील काही भागात मोठी झाडे वीज तारांवर कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. या भागातील वीज पुरवठा सुरळीत करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची मोठी कसरत करावी लागली.

नरेंद्रनगर, मनीषनगर, त्रिमूर्तीनगर, लक्ष्मीनगर, बेसा, तात्या टोपे उद्यान, चितळे रोड, बिनाकी या भागात वादळी पावसामुळे मोठ-मोठी झाडे, झाडांच्या फांद्या, बॅनरची कापडे वीज वाहिन्यांवर पडल्याने तारा तुटूनविजेच्या लपंडावाने उडाली नागपूरकरांची झोप

वीज पुरवठा विस्कळित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी जाऊन सर्वप्रथम ३३ व ११ किलोवॅटच्या उच्चदाब वाहिन्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य दिले. त्यानंतर इतर लघुदाब वाहिन्यांवरील वीज पुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात केली. शहरातील बहुतांश भागात टप्याटप्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. अनेक ठिकाणी दुपारपर्यंत हे काम सुरू होते. बेसा व बेलतरोडीसह अनेक भागात रात्रभर वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.

अजनी परिसरातील सावरकरनगर, सेंट्रल एक्साईज कॉलनी, नरेंद्रनगर येथे मोठी झाडे कोसळल्याने महावितरणच्या संपूर्ण वीज तारा व पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले. नरेंद्रनगर भागात सर्वाधिक नुकसान झाले.

विशेषतः या भागातील खुल्या मैदान जवळील वीज तारांवर मोठ-मोठाली झाडे कोसळल्याने या झाडाच्या फांद्या बाजूला करून त्या खांबावरील वीज तारांना परत जोडणी करण्याची मोठी कसरत महावितरण व महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावी लागली. त्यामुळे या भागातील वीज पुरवठ्याचे काम रात्रीपासूनच सुरू होते

ते शुक्रवारी दिवसाही चालू होते. वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी महावितरणची संपूर्ण यंत्रणा गुरुवारी रात्रभर व शुक्रवारी पूर्ण दिवस वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्पर होती. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे प्रभावित झालेल्या भागांना भेटी देऊन वीज यंत्रणेच्या दुरुस्ती कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

अजनी उपकेंद्रावर नागरिकांचा जमाव

अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या कार्यालयात नागरिकांचे फोन खणखणले होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून टोल फ्री क्रमांक व कार्यालयातील क्रमांकावर फोन केल्यानंतर प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिक संतप्त झाले होते. असाच संतप्त झालेला नागरिकांचा जमाव अजनी उपकेंद्रात घुसला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्ताने जमाव शांत झाला. रात्रभर वीज पुरवठा खंडित झाल्याने उन्हाळ्याच्या या दिवसात उकाड्यामुळे नागरिक हैरान झाले होते. उकाड्यामुळे वृद्धांच्या प्रकृती खालावल्याची माहिती आहे.

नागपूर, ता. २१ः सदर येथील जे.पी. हाईट्स येथील मागच्या बाजूला झाड भिंतीवर पडल्यामुळे झोपडीतील मायलेकांचा मृत्यू झाला असतानाच, वादळामुळे टीन अंगावर पडल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनिषनगरात सायंकाळच्या सुमारास घडली. त्यामुळे कालच्या वादळातील मृत्यू संख्या चारवर गेली आहे.

गौरीलाल सुतुराम पटेल (वय ३२) आणि त्यांची पत्नी रामला गौरीलाल पटेल (वय ३१, रा. दोन्ही सोलदा, ता. बलोदा बाजार, छत्तीसगढ) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. ते सध्या मनिषनगर परिसरातील

वादळामुळे दाम्पत्याचा मृत्यू

गुरूछाया अपार्टमेंटमध्ये टिनाच्या शेडमध्ये वास्तव्यास होते. बेलतरोडी परिसरात, गेल्या काही महिन्यांपासून गौरीलाल व त्याची पत्नी टिनाच्या शेडखाली वास्तव्य करीत होते. ते दोघेही मजूर होते. सायंकाळी वादळ उठल्याने टिनाचे शेड खाली पडले. त्यामुळे त्या खाली दबून दोघेही जखमी झाले. त्यांना एम्स हॉस्पीटल येथे नेले असता दोघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वैद्यकीय सुचनेवरून बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT