nagpur  sakal
नागपूर

Nagpur News : पावसामुळे फुलांचा सुगंध महागला कुंदा आणि निशिगंध ८०० रुपये किलो

दरवर्षी गणेशोत्सव, ऋषीपंचमी, गौरी पूजनाच्या काळात फुलांची मागणी वाढत असते. यंदा मात्र, अचानक आलेल्या पावसाने महागाई अधिकच वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - सणांवर महागाईचे सावट असताना आता पावसामुळे आवक कमी झाल्याने गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला फुलांचे भाव वाढले आहेत.

आज बाप्पाचे आगमन आणि काल हरतालिकामुळे फुलांची मागणी वाढल्याने भाव आकाशाला भिडले आहे. दोनच दिवसांनी गौरीचे आगमन होणार फुलांचे भाव अजून वधारणार आहे.

दरवर्षी गणेशोत्सव, ऋषीपंचमी, गौरी पूजनाच्या काळात फुलांची मागणी वाढत असते. यंदा मात्र, अचानक आलेल्या पावसाने महागाई अधिकच वाढली आहे.

सणासुदीमुळे मागणी वाढत असली तरी यंदा मात्र पावसामुळे फुलांचे नुकसान झाले आहे. मागणी कमी आणि आवक वाढल्याने भाववाढ झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी फुलांचे भाव सामान्य होते, दोन दिवस पोळ्याच्या दिवशी झालेल्या पावसाने फूल शेतीचे नुकसान झाले.

पूर्वी ३० आणि ४० रुपये किलोने असलेला झेंडू थेट ७० ते ९० रुपये किलोवर गेला. हैदराबाद बाजारपेठेत वाढ झाल्याने नागपुरातील आवक कमी झाली आहे.

आता फक्त स्थानिक फुलांवर अवलंबून राहावे लागणार आहे. पावसाच्या आशीर्वादावर पुढील व्यवसाय अवलंबून राहणार आहे.

पावसामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सणासुदीच्या निमित्ताने फुलांची मागणीही वाढलेली आहे. त्यामुळे फुलांच्या दरात विक्रमी भाव वाढ झालेली आहे. दोन दिवसाने गौरीपूजन असल्याने मागणी वाढणार असल्याने भाव वाढ होणार आहे.

जयंत रणनवरे, घाऊक फूल विक्रेता.

फूल आधीचे दर आजचे दर

(रु. प्रतिकिलो) (रु. प्रतिकिलो)

झेंडू ३० ते ४० ७० ते ९०

लहान झेंडू ४० ते ५० ८० ते ९०

गुलाब ७० ते ८० ३०० ते ३५०

गुलाब ७० ते ९० २५० ते ३००

शेवंती ८० ते १०० २०० ते २५०

कुंदा ३५०ते ४०० ८०० ते ८५०

निशिगंधा १०० ते १२० ६०० ते ८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा; पुढील ६० ते ७२ तासांत तापमानात मोठी वाढ

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT