नागपूर

Nagpur News : ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अवैध, नोकरी धोक्यात

तहसीलदाराचा अहवाल उत्पन्न जास्त असतानाही ते कमी दाखविले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - आर्थिक दुर्बल घटकाच्या (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्राच्या आधारे एकाने शासकीय नोकरी लाटली. परंतु हे प्रमाणपत्र बोगस असल्याचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे संबंधिताची नोकरी धोक्यात आली आहे.

शासकीय नोकरीत ईडब्‍ल्यूएससाठी १० टक्के जागा आरक्षित आहे. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाची अट आहे. उत्पन्न जास्त असतानाही ते कमी दाखवून ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र लाटण्यात येत आहे.

असाच प्रकार शहरात झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकीय क्षेत्रात नुकतीच भरती झाली. यात एक महिला उमेदवाराने ईडब्ल्यूएस वर्गातून नोकरीसाठी अर्ज केला. त्यांची नियुक्तीही झाली. परंतु त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला.

संबंधित महिला उमेदवाराचे उत्पन्न जास्त असून प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना दिले. तहसीलदार संतोष खांडरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली.

चौकशीत संबंधित प्रमाणपत्र अयोग्य असल्याचे दिसून आले. त्याबाबतचा अहवाल त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. प्रमाणपत्र अयोग्य ठरल्याने संबंधित महिला उमेदवाराची नोकरी धोक्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदारांच्या अहवालावर वरिष्ठांकडे अपील करता येते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT