Nagpur News  sakal
नागपूर

Nagpur News : शेतकऱ्यांच्या पैशांबाबत उत्तर दाखल करण्यास अखेरची संधी;वस्त्रोद्योग मंत्रालय व सीसीआयला उच्च न्यायालयाची नोटीस

सात-सात दिवस लोटूनही कापूस विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना का मिळत नाही, असा प्रश्‍न करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सात-सात दिवस लोटूनही कापूस विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना का मिळत नाही, असा प्रश्‍न करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, सहा आठवड्यांचा अवधी लोटूनही उत्तर सादर न केल्याने केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग व भारतीय कापूस महामंडळाला (सीसीआय) उच्च न्यायालयाने आता शेवटची संधी देत दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. तसेच, होणाऱ्या दिरंगाईबाबत कारण स्पष्ट करण्याचे आदेशही दिले आहे.

ग्राहक पंचायत संस्थेचे संयोजक श्रीराम सातपुते यांनी यासंदर्भात जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, शासकीय कापूस खरेदी केंद्र वेळेवर सुरू होत नसल्याने खाजगी व्यापारी हमी भावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी करतात. त्यामुळे, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

हा प्रकार थांबविण्यासाठी दिवाळीपूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व तालुकास्तरावर शासकीय खरेदी केंद्र सुरू करावीत, शेतकऱ्यांच्या मालाची विक्री केल्यानंतर पैसे सात दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर, न्यायालयाने भारतीय कापूस महामंडळ व कापूस पणन महासंघाला उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे.

तसेच, यावर याचिकाकर्त्याला प्रत्युत्तर द्यायचे असल्यास त्यांनी ते दोन आठवड्यांमध्ये दाखल करावे, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. पुढील सुनावणी १८ जुलै रोजी निश्‍चित केली. याचिकाकर्ते श्रीराम सातपुते यांनी स्वतः बाजू मांडली. तर, केंद्र शासनातर्फे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया नंदेश देशपांडे यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT