nagpur sakal
नागपूर

Nagpur News : विदेशी अनुयायी अनुभवणार उपराजधानीचे सौंदर्य! दीक्षाभूमीवर लागणार एलईडी स्क्रीन

येत्या २४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमीवर भीमसागर उसळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - धम्मचक्र प्रवर्तनदिनासाठी दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी येणार असून यात विदेशी अनुयायांचाही समावेश आहे. या विदेशी अनुयायांना नागपूरची श्रीमंती, सौंदर्य दाखविण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. दीक्षाभूमीवर मोठा एलईडी स्क्रीन लावण्यात येणार असून त्यावर शहराच्या वैशिष्ट्यपूर्ण माहितीसह येथील रस्ते, उड्डाणपूल, हिरवळ, तलाव आदी २४ तास दाखविले जाणार आहे.

येत्या २४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमीवर भीमसागर उसळणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेने सुविधांची तयारी पूर्ण केली आहे. तात्पुरते, फिरते शौचालये, नळ, वैद्यकीय सुविधा, अग्निशमन यंत्रणा आदी उभारली आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त देशातीलच नव्हे तर

विदेशी अनुयायी अनुभवणार उपराजधानीचे सौंदर्य!

जपान, थायलंड, श्रीलंका, म्यांमार या देशातूनही बौद्ध अनुयायी दिक्षाभूमीवर येणार आहेत. दरवर्षी विदेशी बांधव येत असून वर्षभरात शहराचा चेहरामोहराही बदलला आहे. नागपुरात मार्चमध्ये जी-२० परिषद झाली. त्यानिमित्त शहराची सजावट करून रस्त्यांवर आकर्षक रोषणाई, सौंदर्यीकरण, आकर्षक कारंजे, ठिकठिकाणी फुलझाडे लावण्यात आली होती.

नाल्याच्या भिंतीही लक्षवेधक ठरल्या होत्या. एकूणच शहर नववधूसारखे सजविण्यात आले होते. यातून शहराचे सौंदर्यच नव्हे तर श्रीमंतीही खुलून दिसली होती. याकाळात महापालिकेने व्हिडीओ तयार करून नागपूरचे सौंदर्य, श्रीमंतीचे जतन करून ठेवले आहे. आता हेच व्हीडीओ दाखविण्यासाठी महापालिका दिक्षाभूमीवर मोठे स्क्रीन लावणार असून जगभरातून आलेल्या नागरिकांना शहराचे सौंदर्य अनुभवता येणार आहे.

महापालिका सज्ज

यंदा धम्मचक्र प्रवर्तनदिनासाठी जगभरातून येणाऱ्या ८ ते ९ लाख बौद्ध बांधवांच्या विविध सुविधांसाठी महापालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आले. दिक्षाभूमीवर साडेसहाशे कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार असून परिसरात ९०० अस्थायी शौचालये, प्रत्येक तीस फूटावर कचरापेटी, चार फिरते शौचालये, १४० तात्पुरते नळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आरोग्य सुविधेसाठी मोबाईल मेडिकल युनिट २४ तास कार्यरत राहणार आहे.

जपान, थायलंड, श्रीलंका, म्यांमार या देशातूनही बौद्ध अनुयायी दिक्षाभूमीवर येणार आहेत. दरवर्षी विदेशी बांधव येत असून वर्षभरात शहराचा चेहरामोहराही बदलला आहे. नागपुरात मार्चमध्ये जी-२० परिषद झाली. त्यानिमित्त शहराची सजावट करून रस्त्यांवर आकर्षक रोषणाई, सौंदर्यीकरण, आकर्षक कारंजे, ठिकठिकाणी फुलझाडे लावण्यात आली होती. नाल्याच्या भिंतीही लक्षवेधक ठरल्या होत्या. एकूणच शहर नववधूसारखे सजविण्यात आले होते.

यातून शहराचे सौंदर्यच नव्हे तर श्रीमंतीही खुलून दिसली होती. याकाळात महापालिकेने व्हिडीओ तयार करून नागपूरचे सौंदर्य, श्रीमंतीचे जतन करून ठेवले आहे. आता हेच व्हीडीओ दाखविण्यासाठी महापालिका दिक्षाभूमीवर मोठे स्क्रीन लावणार असून जगभरातून आलेल्या नागरिकांना शहराचे सौंदर्य अनुभवता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT