nagpur sakal
नागपूर

Nagpur News : मुलीच्या लैंगिक शोषणाचा तपास गुन्हे शाखेकडे

महिला आयोगाकडून दखल राजपूत यांच्याकडून काढला तपास

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - दहा वर्षीय मुलीचा अमानुष छळ प्रकरणाच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने हुडकेश्वर ठाण्याचे पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्याकडून हे प्रकरण काढण्यात आले. आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या (एचटीयू)प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे देण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. बंगळूरूमधील एका चौकीदाराच्या कुटुंबाकडून घरकाम करण्यासाठी आरोपी तहा अरमान खान, पत्नी हिना खान आणि मेहुणा अजहर शेख या तिघांनी दहा वर्षीय चिमुकलीला घरी आणले होते. तिच्याकडून घरातील सर्व कामे करून घेतल्या जात होते.

अरमान आणि अजहर हे दोघे चिमुकलीचे लैंगिक शोषण करीत होते. तिच्या अंगावर सिगारेटचे चटके देत होते. याबाबत हिनाकडे तक्रार केली असता ती सुद्धा गरम ताव्याचे चटके देत होती.

खान कुटुंब बंगळूरूला निघण्याआधी त्यांनी मुलीला घरात बाथरूममध्ये कोंडून ठेवले होते. हा प्रकार उघडकीस येताच हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाळू राठोड यांच्याकडे होता.

दरम्यान आरोपींना ठाण्यात व्हीआयपी वागणूक मिळत असून आरोपी खुर्चीवर बसून मोबाईलवर बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याबाबत जागरूक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेत पीएसआय राठोड यांना निलंबित केले.

त्यानंतर पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. मात्र, तपासावर अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने मंगळवार १२ सप्टेंबरला ठाणेदार राजपूत यांच्याकडूनही तपास काढत गुन्हे शाखेच्या एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे नव्याने तपास सोपविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT