Dentral Treatment Sakal
नागपूर

Nagpur : डेंटिस्टच्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांसह रुग्णांचे नुकसान; बाल दंतरोग विभागाची मान्यताही धोक्यात?

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील पदव्युत्तर बाल दंतरोग विभागप्रमुखांसह एका सहयोगी प्राध्यापकाची बदली झाली. या बदल्यांमुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह रुग्णांचे नुकसान होत आहे.

या विभागात फेलोशिपचे विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना शासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. विशेष असे की, जुलै महिन्यात भारतीय दंत परिषदेकडून निरीक्षण होणार आहे. विभागाप्रमुखाशिवाय बाल दंतरोग विभागाची मान्यता धोक्यात येण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

शासनाने प्रशासकीय बदल्यांचे कारण देत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक यांच्या बदल्या केल्या. मात्र एकाच विभागातील दोन दंत चिकित्सकांच्या अचानक बदल्या झाल्याने या विभागातील दंत रुग्णसेवा प्रभावित झाली. केवळ एकाच सहयोगी प्राध्यापकावर रुग्णांचा भार आला आहे. (Marathi Tajya Batmya)

त्यातही दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम, पीएचडी अभ्यासक्रम तसेच फेलोशिपच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे कोणीच नाही. यामुळे एकीकडे या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे या विभागात बालदंत रुग्णांना तज्ज्ञांच्या सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

रुग्णहित लक्षात घेत नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालयात बाल दंतरोग शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. रितेश कळसकर आणि डॉ. राकेश बहादुरे यांची बदली रद्द करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांच्याकडे दिले आहे.

संचालकांनाही निवेदन

होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेत येथील विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, या विभागाचे आयुक्त तसेच संचालक यांना निवेदन सादर केले आहे. डॉ. कळसकर यांची बदली औरंगाबाद येथील शासकीय दंत रुग्णालयात केली आहे.

मात्र या शासकीय दंत महाविद्यालयात बाल दंत रोग विभागाच नाही. यामुळे डॉ. कळसकर यांच्या हाताला काम नाही, असे बोलले जात आहे. मुंबईतील दंत रोग विभागात बदली केल्यास ते किमान विद्यार्थ्यांना शिकवू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT