Nagpur news mother Suicide due to daughter behavior 
नागपूर

Nagpur : मुलीच्या बेताल वागण्याने दुखावलेल्या आईची आत्महत्या

सातत्याने मुलगी मोबाईलवर असल्याने आईने तो वापरण्यास मनाई केली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सातत्याने मुलगी मोबाईलवर असल्याने आईने तो वापरण्यास मनाई केली. तेव्हा मुलीने आईचा अपमान करीत, नको ते बोलल्याने दुखावलेल्या आईने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी घडली.

अंकिता (३५, सुरेंद्रगढ) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेली अंकिता गृहिणी असून पतीचा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची मुलगी बारावीची विद्यार्थिनी असून मुलगा दहावीत शिकतो. मुलगी नेहमी मोबाईल हाताळत असते. ती समाजमाध्यमांवर सक्रिय आहे.

त्यामुळे अंकिता यांनी मुलीची समजूत घातली. तिने मोबाईल वापरण्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. काही दिवस तिने आईच्या लपून मोबाईल वापरला. आईला ती मोबाईल वापरताना दिसली. त्यामुळे आई पुन्हा चिडली. यावेळी मुलीने आईशी मोबाईल वापरण्यावरून वाद घातला. आईशी मोठ्या आवाजाने बोलली.

त्यामुळे तिला अपमान झाल्याचे वाटले. मुलीच्या वागण्यामुळे दुखावलेल्या अंकिता हिने दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी दुपारी घरात कुणी नसताना सीलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी मुलगी आणि मुलगा घरी आल्यानंतर त्यांना आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी वडिलांना फोन करून कळवले. काही वेळातच वडील घरी आले. त्यांनी गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT