nagpur heat  sakal
नागपूर

Nagpur News : ‘ऑक्टोबर हीट’ने नागपूरकर हैराण

दिवसा चटके, रात्री व पहाटे गारवा, पारा ३५ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - मॉन्सून विदर्भातून परतला असून, आता हिवाळा सुरू होऊन हळूहळू थंडी पडायला सुरुवात झाली आहे. कोरड्या वातावरणामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून, पारा पस्तिशीपार गेला आहे. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. दिवसभर उन्हाचे चटके बसत असून, रात्रीच्या सुमारास हवेत गारवा पसरत आहे.

पावसाने निरोप घेताच ''ऑक्टोबर हिट''चे चटके जाणवायला लागतात. गेल्या तीन-चार दिवसांपासून वैदर्भींना हा अनुभव येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून, रात्रीच्या सुमारास पारा खाली येत असल्याने हवेत गारवा पसरून थंडी पडायला लागली आहे.

शुक्रवारी कमाल तापमानात आणखी वाढ होऊन या हिवाळ्यात पारा प्रथमच ४४.९ अंशांवर गेला. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद वर्धा येथे ३५.५ अंश सेल्सिअस करण्यात आली. सध्या स्थितीत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचा पारा ३२ ते ३६ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाच्या चटक्यांमुळे उकाडा वाढला असून, नागपूरकर अक्षरशः घामाघूम झाले आहेत. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्येही पंखे गरागरा फिरत आहेत.

मॉन्सून राजस्थान व अन्य काही राज्यांतून माघारी परतला असून, विदर्भातूनही शुक्रवारी मॉन्सूनने अधिकृत निरोप घेतल्याची घोषणा, प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात उन्हाचे चटके व थंडीचा खेळ सुरूच राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

SCROLL FOR NEXT