Dr Dilipbuva Dabir Sakal
नागपूर

Nagpur News : या व्यक्तीने मुंबई- पुण्यात ४०० किर्तनकार घडवलेत, जाणून घ्या प्रवास

राष्ट्रीय कीर्तनरत्नाच्या निधनामुळे समृद्ध राष्ट्रीय कीर्तन संपल्याची भावना कीर्तन संप्रदायातून व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : समृद्ध असे राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दिलीपबुवा डबीर यांच्या अचानकपणे आलेली निधनाची वार्ता सायंकाळी शहरासह संपूर्ण राज्यात पसरली. या राष्ट्रीय कीर्तनरत्नाच्या निधनामुळे समृद्ध राष्ट्रीय कीर्तन संपल्याची भावना कीर्तन संप्रदायातून व्यक्त करण्यात आली. वैदर्भीय हरीकीर्तन संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या कीर्तन महाविद्यालयाचे ते प्राचार्य असून महाविद्यालय स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

या महाविद्यालयातून आजवर चारशे कीर्तनकारांनी कीर्तनाचे शास्त्रोक्त धडे घेतले आहेत. कीर्तनासारखा बलाढ्य अन्‌ कठीण प्रकार सर्वांनाच शक्य नाही. अशात, या प्रकारात शास्त्रोक्त शिक्षण घेणे, त्या उपर समांतर शिक्षण प्रक्रियाच तयार करणे कुणाच्या ध्यानी-मनी देखील येण्यासारखे नव्हते. मात्र, मुळचे चंद्रपूरकर असलेले अन्‌ पुढे नागपूरमध्ये स्थायिक झालेल्या दिलीपबुवांनी हे साध्य करून दाखविले.

वक्ता दशसहस्त्रेषु प्राचार्य राम शेवाळकर, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे माजी कुलगुरू पंकज चांदे, ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार मोहनबुवा कुबेर यांची मोलाची साथ लाभली. २००१ रोजी सुरू झालेल्या या महाविद्यालयातून केवळ नागपूर किंवा विदर्भातूनच नव्हे तर पुण्या-मुंबईतील कीर्तनकारांनी नागपूरमध्ये शिक्षण घेत या शास्त्रोक्त शिक्षणाचा देखील लाभ घेतला.

कीर्तन शास्त्रामध्ये पदवी (बी.ए.) आणि पदव्युत्तर (एम.ए.) अभ्यासक्रम त्यांनी स्वत: आखला. पुढे मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला येथे महाविद्यालयाच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. यात दीलीपबुवांचे प्रयत्न नक्कीच मोलाचे ठरले. या सोबतच नारदीय कीर्तन प्रकार सादर करून त्यांनी सुमारे पन्नास वर्षे सेवा दिली. महाविद्यालयाची धुरा सांभाळत त्यांचा हा प्रवास अव्याहत सुरू होता.

कीर्तनासाठी त्यांनी महाराष्ट्रासह अख्खा देश पिंजून काढला. कलकत्ता, जमशेदपूर, दिल्ली, भोपाळ, जयपूरसह संपूर्ण बृहन्महाराष्ट्रात त्यांनी नारदीय कीर्तन पोहोचविले. महाराष्ट्र शासनातर्फे चालणाऱ्या शासकीय कीर्तन महोत्सवाचे आणि कीर्तन प्रशिक्षण शिबिरांचे अनेक वर्षांपासून मार्गदर्शक आणि संचालक ते होते. सोबतच नागपूरसह विदर्भात भव्य स्वरूपात ‘कीर्तन महोत्सव’ आयोजित करण्यामागची त्यांचीच संकल्पना होती व ती यशस्वी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT