Nagpur Flood Video Sakal
नागपूर

Nagpur Flood Video : मध्यरात्री ढगफुटी, पोलिसांना पहाटेचा फोन अन्...; पुरातून वाचवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

'ते' पोलिस अधिकारी ठरले देवदूत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपुरात मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटी झाली. यामुळे सर्वत्र पाणी साचले. नाले ओवरफ्लो झाले. अशा परिस्थितीत जीवाची पर्वा न करता एक वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने दोघांचे प्राण वाचवून आपल्या शौर्याची प्रचिती दिली.

सीताबर्डी तील जानकी टॉकीज परिसरात पहाटे पाच वाजताच्या सुमारास पाणी साचल्याच्या कॉल वायरलेस वर आला. आपले काम आटोपून यशोधरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ध्यानेश्वर भेदोडकर हे आपल्या पोलिस वाहनात घराकडे जात होते. यादरम्यान ते सीताबर्डी परिसरात आले असताना त्यांनी तो ऐकला.

यावेळी महापालिकेच्या अग्निशमन दल पोहचला नसल्याची माहिती त्यांना मिळाली. ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, यावेळी नाल्याच्या भाग पाण्याने फुटून बाजूला मोठ्या फ्लो वाहू लागला. यामध्ये ४२ वर्षीय संगीता तिवारी आणि त्यांचा १६ वर्षीय मुलगा फसल्याचे आढळून आले.

त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी भेदोडकर यांनी गाडीत असलेला दोर आणि बेल्ट काढून त्याद्वारे आपल्या सहकाऱ्यांसह त्यांना अतिशय धैर्याने सुखरूप बाहेर काढले. भेदोडकर यांच्या या शौर्याने दोन जीवांचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT