nagpur news  sakal
नागपूर

Nagpur News : कधी लागणार हो एसटी फलाटावर?

तलाठी भरतीसाठी आलेल्या परीक्षार्थींची दमछाक ः मराठा आंदोलनामुळे बस फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - मराठा आंदोलनामुळे प्रवाशांची एसटी महामंडळाने सलग चवथ्या दिवशी बस फेऱ्या रद्द केल्या. यामुळे विदर्भातून तलाठी पदाची परीक्षा देण्यासाठी शहरात आलेल्या उमेदवारांची दमछाक झाली. भरउन्हात बसची वाट पाहत प्रवासी घामाच्या धारा पुसत होते. मात्र, फलाटावर बस लागत नसल्याने कधी येणार एसटी? असा एकच केविलवाना प्रश्‍न ते करताना दिसले.

सोमवारी दुपारी ३.३० वाजताची वेळ. गणेशपेठ मध्यवर्ती स्थानकाच्या फलाट क्रमांक १३ वरून पंढरपूर, लातूर, नांदेड, परभणी, अंबेजोगाई, पुसद, छ. संभाजीनगर, यवतमाळच्या बस जातात. या फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.

तलाठी भरतीचा पेपर देऊन स्थानकावर आलेले परीक्षार्थी व मराठवाड्याकडे जाणारे प्रवासी उभे होते. दुपारची रणरणती ऊन, उकाड्याने प्रवासी घामाघूम झाले होते. मात्र, मराठवाडाकडे जाणारी एसटी लागलीच नव्हती तर यवतमाळ मार्गाने जाणाऱ्या बसला विलंब होत होता.

परीक्षार्थी एक-एक तास एसटीच्या प्रतीक्षेत होते. एसटी लागताच महिला, परीक्षार्थी खिडकीतून सामान फेकून सीट ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत होते. अवघ्या दोन मिनिटात बस हाऊसफूल होत होती. मात्र, बस लगेच सुटत नसल्याने गर्दीने बसमध्ये प्रवाशांचा जीव गुदमरत होता.

तलाठी भरतीचे परीक्षार्थी आणि प्रवाशांमुळे ही परिस्थिती इतरही फलाटावर दिसत होती. मात्र, सर्वात जास्त फटका बसला तो मराठा आंदोलनामुळे फेऱ्या रद्द झालेल्या प्रवाशांना.

गेल्या एका तासापासून बसच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, बस फलाटावर लागली नाही. काही वेळापूर्वी एक बस गेली. ती लगेच फूल झाल्याने जागाच मिळाली नाही.

कुणाल खराडे,

तलाठी परीक्षार्थी- पुसद

छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत होतो. मात्र, बस फेरी रद्द झाल्याचे फलाटावर समजले.

अरुण शेगोकार,

प्रवासी- उमरेड

प्रवाशांची सुरक्षा व महामंडळाचे नुकसान टाळण्यासाठी नागपूर विभागातून मराठवाडाकडे जाणाऱ्या बस फेऱ्या सलग चवथ्या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. परिस्थिती आटोक्यात येताच पुन्हा गाड्या सुरू करण्यात येईल.

श्रीकांत गभने, उपमहाव्यवस्थापक- एसटी महामंडळ, नागपूर व अमरावती विभाग

६ हजार ५९३ किमीच्या फेऱ्या रद्द

जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. एसटी पेटविण्यात आल्या होत्या. याचा परिणाम एसटी सेवेवर झाला. सलग चवथ्या दिवशी सोमवारी, गणेशपेठ मध्यवर्ती स्थानकावरून ६ हजार ५९३ किलोमीटरच्या २४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या सर्व गाड्या छत्रपती संभाजीनगर, अंबेजोगाई, सोलापूर, पुणे, पंढरपूर आदी ठिकाणी जाणाऱ्या होत्या. प्रवाशांना माहिती नसल्याने फलाट क्रमांक १३ वर बहुतांश प्रवासी बसची वाट पाहात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT