Nitin Raut Sakal
नागपूर

नागपूर : दिव्यांग कल्याण निधीचे काटेकोर नियोजन करा

डॉ. नितीन राऊत, प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्डसाठी विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिव्यांग कल्याण निधी संदर्भात केंद्र व राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण समितीच्या सभेत दिल्या.

रविभवन येथे जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची सभा पार पडली. यामध्ये ५ टक्के दिव्यांग कल्याण नीतीचे नियंत्रण करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या नियमानुसार रणनीती आखण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब देशमुख,जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या स्वउत्पन्नाच्या पाच टक्के निधी मधून दिव्यांगासाठी विकासाच्या योजना राबविण्याबाबत निर्देश आहेत. या सभेत २०२०-२१ या वित्तीय वर्षात राबविण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण योजनांची माहिती देण्यात आली. तसेच दिव्यांग प्रमाणपत्र व यूडीआयडी कार्ड वितरित करण्याकरिता विशेष मोहीम व शिबिराचे आयोजन करण्याचे निर्धारित केले आहे.

त्यामध्ये आत्तापर्यंत किती लाभार्थ्यांना कार्ड वितरित झाले? याबाबतचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक इमारतीमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी अडथळा विरहित वातावरण निर्मिती करणे, जुन्या इमारतीमध्ये सुविधा निर्माण करणे, याबाबत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT