Cheating
Cheating esakal
नागपूर

Nagpur : NVCC अध्यक्षासह पदाधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसी) वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या राडाप्रकरणानंतर माजी अध्यक्ष यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

आता अध्यक्षांकडून पदाचा दुरुपयोग करीत, खोटी कागदपत्रे आणि बनावट बैठकांच्या मिनिट्सच्या माध्यमातून आर्थिक फायदा घेतल्याच्या माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सचिव रामअवतार तोतला यांचासह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

एनव्हीसीसी’ अध्यक्षासह पदाधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

२०१९ साली अश्‍विन मेहाडिया एनव्हीसीसीच्या अध्यक्षपदी निवडून आले. मात्र, त्यांचा डायरेक्टर आयडेन्टीफिकेशन नंबर रजिस्‍ट्रार ऑफ कंपनीने ब्लॉक केला. त्यामुळे ते अपात्र झालेत. असे असतानाही त्यांनी ही बाब एनव्हीसीसीपासून लपवून निवडणूक लढविली.

त्यानंतर त्यांनी ‘सर्टीफिकेट ऑफ ओरिजिन ३’ संघटनेशी संबंध नसलेल्या मेहूल शाह याला दिले. त्यासाठी त्यांनी ३०० ऐवजी १०० रुपये घेतले. त्याची सहमती असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी बनावट झुम बैठक आणि कागदपत्रे तयार केलीत.

तसेच संस्थेचे लेटरहेड, सील, स्टॅम्प वापरले. याशिवाय १०० कोटीची जमीन असताना, २०२१ साली त्यांनी दोन कोटी रुपयांची जागा आणि अडीच कोटी रुपयांचे धनादेश एनव्हीसीसीला मिळवून दिले.

यावेळी सदस्यांना न्यायालयाची भीती दाखवित या व्यवहारात कोट्यवधींचा अपहार करीत एनव्हीसीसीची फसवणूक केली. त्यानुसार दीपेन अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अश्‍विन मेहाडिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

बैठकीतही झाला होता राडा

१७ डिसेंबर रोजी झालेली आमसभा तसेच निवडणुकीवरून आजी व माजी पदाधिकाऱ्यांत संघर्ष‌ उफाळला होता. त्यातून दीपेन अग्रवाल यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे रेकॉर्डिंग करता यावे, म्हणून माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी मुकेश सगलानी व त्यांच्या चमूला बोलावले.

रेकॉर्डिंग सुरू झाल्यावर अश्विन मेहाडिया यांनी शिवीगाळ करून धमकावले आणि रेकॉर्डिंग बंद पाडल्याची तक्रार दीपेन अग्रवाल यांनी दिली होती. त्यातून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT