नागपूर

What's App Fraud: व्हॉट्स अ‍ॅपच्या शेअर मार्केट ग्रुपवर अ‍ॅड झाला अन् गमावले २२ लाख, हे अ‍ॅप ठरलं कारणीभूत

ट्रेडिंगच्या नावाखाली पैसे गुंतविल्यास जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने २२ लाख ८६ हजार रुपयांनी फसवणूक केली. तक्रारीवरून सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur What's app Trading Fraud: अनोळखी व्हॉट्स ॲप ग्रुपवर विश्वास ठेवणे एका वृद्धाला चांगलेच महागात पडले. ट्रेडिंगच्या नावाखाली पैसे गुंतविल्यास जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने २२ लाख ८६ हजार रुपयांनी फसवणूक केली. तक्रारीवरून सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

तक्रारदार हे अजनी भागात राहतात. त्यांना अनोळखी व्यक्तीने एफवाय ३३७ या व्हॉट्स ॲप ग्रुपवर ॲड केले. त्यानंतर मेसेज पाठवून एफवाय गोल्ड नावाचा ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. यावर ट्रेडिंग केल्यास जास्त नफा मिळेल, अशी थाप मारली. तक्रारदाराचा विश्वास बसला. त्यांनी ॲपवर ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली.

ठकबाजाने वेगवेगळ्या बँकेतून त्यांना पैसे भरण्यास सांगितले. आपल्याला अधिक नफा मिळेल, या आशेवर त्यांनी पैसे भरायला सुरुवात केली. पैसे भरण्याची रक्कम हळूहळू वाढत जाऊन ती २२ लाख ८६ हजार रुपयांपर्यंत गेली. हा सर्व व्यवहार २० डिसेंबर २०२३ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान झाला. (Latest Marathi News)

दीड महिन्यांचा कालावधी लोटून त्यांना नफा मिळाला नाही. संशय बळावल्याने त्यांनी ठकबाजाशी संपर्क साधला. मात्र, संपर्क झाला नाही. आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
तक्रारीवरून पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा नोंदवून सायबर गुन्हेगाराचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..!

Thane News: वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा, ३० घरांना नोटीसा; दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT