चरख्याची sakal
नागपूर

Nagpur : संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

जयंत तांदुळकरांचा चरखा ‘लिम्का बुक’मध्ये

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आगळावेगळा छंद जोपासणारे शहरातील जयंत तांदुळकर यांनी तयार केलेल्या नखावर ठेवता येणारा चरख्याची लिम्का बुक ऑफ रेकार्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात त्यांना याबाबतचे प्रमाणपत्र मिळाले असून त्यांच्या या कलाकृतीमुळे संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. तांदुळकरांच्या या ४० मिलिग्राम वजनाच्या चरख्याची यापूर्वी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’नेही नोंद घेतली आहे, हे विशेष.

झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी व महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल पदावर कार्यरत

संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

जयंत तांदुळकर पक्षीप्रेमीसोबतच विविध छंदही जोपासतात. अनेक आश्चर्यकारक वस्तु तयार केल्या आहेत. त्यापैकी सर्वात लहान आकाराच्या चरख्याने शहराचाही गौरव वाढवला. त्यांनी २०२० मध्ये ३.२० मिमी लांबी, २.६८ मिमी रुंदी आणि ३.०६ मिमी उंचीचा चरखा तयार केला. या चरख्याचे वजन केवळ ४० मिलिग्राम आहे.

हा चरखा तयार करण्यासाठी त्यांनी लहान काड्या, स्टील तार आणि कापसाचे सूत वापरले आहे. एवढा लहान आकार असून या चरख्यावर सूत कातले जाते. हा एक पूर्णपणे कार्यरत चरखा आहे. हा अभिनव चरखा जगातील सर्वात लहान असल्याचा दावा जयंत तांदुळकर यांनी केला आहे. २०२० पासून या चरख्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु कोरोना काळामुळे ही प्रक्रिया मंदावली.

आता मागील आठवड्यात त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडून नोंद केल्याचे प्रमाणपत्र मिळाले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, २०२१ मध्ये या चरख्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१ आणि मागील वर्षी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२२ मध्ये नोंद झाली. मुळात पक्षीप्रेमी असलेले तांदुळकर यांच्या घराच्या गच्चीवर बाराही महिने दररोज चिमण्या व अन्य पक्ष्याचा चिवचिवाट असतो.

स्वतःचाच विक्रम मोडण्याची तयारी

जयंत तांदुळकर यांनी स्वतःचाच विक्रम मोडण्याचीही तयारी केली आहे. त्यांनी अलिकडेच रेकॉर्ड्स बुकमध्ये नोंद झालेल्या चरख्यापेक्षाही लहान आकाराचा चरखा निर्माण केला आहे. त्यांच्याकडे अनेक प्राचीन व आधुनिक वस्तूंचा अमूल्य ठेवा आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतातील महात्मा गांधी व गौतम बुद्धांपर्यंत जवळपास सर्वच डाक तिकिटे, विविध आकारांची नाणी, देशविदेशातील चलनी नोटांसह अनेक वस्तू असून घरीच त्यांनी संग्रहालय तयार केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश देत चरख्यावर सूत कातणे सुरू केले अन् स्वावलंबी भारताचा पाया घातला होता. सध्या स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला. यामुळे, मी या लहान आकाराच्या चरख्याच्या प्रतिकृतीतून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला.

- जयंत तांदुळकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT