Nagpuri orange sakal
नागपूर

Nagpur : संत्र्याच्या पिकविम्यासाठी पाचपट रक्कम

संत्रा पिकाला लागलेले ग्रहण सुटता सुटेना

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा : पुनर्रचित हवामान आधारित फळविक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३ साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार नागपूर जिल्ह्यातील मोसंबी, संत्रा या अधिसूचित पिकांकरीता अधिसूचित महसूल मंडळामध्ये विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. ही योजना शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार यावर्षीपासुन कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. पण संत्रा पिकाच्या आंबिया बहारासाठी विमा महाग करण्यात आल्याने व तो ही एक दोन नाही तर पाच पट. यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे संत्रा पिकाला लागलेले ग्रहण काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

नागपुरी संत्रा नावाने प्रसिद्ध असलेल्या संत्र्याचे सर्वात जास्त उत्पादन हे काटोल विधानसभा क्षेत्रात घेतले जाते. पण काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा व मायबाप शासनाचे दुर्लक्ष यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी डबघाईला आला आहे. यावर काही उपाययोजना करण्याऐवजी किंवा संत्र्याला राजाश्रय देण्याऐवजी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संपविण्याचा घाटच शासनाकडून होताना दिसत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे.

शासनाने नुकतेच फळ पीक विम्याचे हफ्ते जाहीर केले व यात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी आंबिया बहराचा विमा काढायचा झाल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी ४ हजार रुपये विमा हफ्ता भरावा लागत होता व त्यांना ८० हजार रुपयांचा सरंक्षित विमा मिळत होता. पण मागील वर्ष २०२१-२२ पासून आंबिया बहारसाठी विमा सरंक्षित रक्कम ८० हजार रुपये असून मात्र शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या हफ्ता पाच पटीने वाढविला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना २० हजार रुपये एक हेक्टरच्या विम्यापोटी भरावे लागणार आहे. तसेच केंद्र शासन १० हजार, तर राज्य शासन ३० हजार रुपये भरणार आहे.

म्हणजेच एक हेक्टरचा संत्रा पिकाचा विमा काढायचा झाल्यास विमा कंपनीला ६० हजार रुपये मिळतील व नुकसान झाल्यास कंपनी देईल ८० हजार रुपये. आधीच विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करतात व आता तर त्या मालामाल होणारच.

भेदाभेद कशासाठी?

संपूर्ण राज्यात एका पिकासाठी विम्याचा हफ्ता देखील एकच असणे अनिवार्य असताना देखील जिल्हानिहाय यात फरक करण्यात आला आहे. यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये, तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४ हजार रुपये असा हफ्ता असल्याने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २० हजार रुपये कसा, हा खरा प्रश्न आहे. पीक एक, सरंक्षित रक्कम ही सारखी, तर मग विमा हफ्ता वेगवेगळा कसा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT