Oxygen Plant Sakal
नागपूर

Oxygen Plant : जीव गेल्यावर उभारणार का ऑक्सिजन प्लांट? निधी अभावी रखडले दोन प्रकल्प

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले.

नीलेश डोये

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले.

नागपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अथवा इतरही वेळी ऑक्सिजनची कमतरता होऊ नये म्हणून जिल्ह्यात दोन ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहे. परंतु, दोन्ही प्लांटचे काम थंडबस्त्यात असून साहित्यही धूळखात आहे. निधी अभावी हा प्लांट रखडला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. लोकांचा मृत्यू झाल्यावरच सरकार या प्लांटसाठी निधी देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

वर्ष २०२० मध्ये कोरोना संसर्गाने अख्ख्या जगात थैमान घालता होता. त्यानंतरच्या वर्षात २०२१ मध्ये दुसऱ्या टप्प्यात अधिकच हाहाकार माजवला. लाखो लोकांचा यामुळे मृत्यू झाला. अनेक जण उपचाराअभावी तर अनेकांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाला. त्यावेळी नागपूर जिल्ह्यात परराज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा झाला होता. पुरवठा करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. एकंदरितच ही परिस्थिती बघता जिल्ह्यात सावनेर व उमरेड येथे ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला. दोन्ही प्लांटसाठी जवळपास अडीच कोटींचा खर्च होता.

२०२०-२१ च्या दरसूचित कामाला तांत्रिक मान्यताही देण्यात आली. २०० एनएम(२) प्रति तास क्रायोजेनिक ऑक्सिजन जनरेट करणारे हे प्लांट आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही प्लांटसाठी दीड कोटींचा निधी मिळाला होता. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने स्थगिती देत अनेक कामांवरील निधी रोखला. त्यामुळे या प्रकल्पांचेही काम रखडले. दुसरीकडे ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक यंत्रांकरिता ३ कोटींची गरज होती. काही साहित्याचा पुरवठा झाला. परंतु कामच पूर्ण झाले नसल्याने हे कोट्यवधीचे यंत्रही धूळखात पडले आहे.

लक्ष द्यायलाही कुणीच नसल्याने यंत्र चोरी जाण्याची शक्यता आहे. याचा उपयोग न झाल्यास आतापर्यंत झालेला खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने केंद्र सरकारने ऑक्सिजनवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहे. परंतु राज्य सरकार यावर गंभीर नसल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT