नागपूर

चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या कर्मचाऱ्याची रेल्वेकडे माहिती नाही! कोच अटेंडन्ट, वेंडरांबाबत लोहमार्ग पोलिसही अनभिज्ञ

वैध-अवैध वेंडरांचा भरणा मोठ्या प्रमाणात असून अटेंडन्ट आणि वेंडरांच्या पोलिस व्हेरिफिकेशन (पडताळणी) बाबत लोहमार्ग पोलिस अनभिज्ञ असून त्यांना याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Patliputra Express Coach Attendant Molested Minor Girl: धावत्या रेल्वेत एसी डब्यात कोच अटेंडन्टने नऊ वर्षाच्या मुलीला शौचालयात कोंडून अत्याचाराचा प्रयत्न केला. या घटनेने रेल्वेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानकावरही वैध-अवैध वेंडरांचा भरणा मोठ्या प्रमाणात असून अटेंडन्ट आणि वेंडरांच्या पोलिस व्हेरिफिकेशन (पडताळणी) बाबत लोहमार्ग पोलिस अनभिज्ञ असून त्यांना याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

रेल्वेच्या एसी कोचमध्ये बेडरोल देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंत्राटदार नेमले आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून अटेंडन्टची भरती केली जाते. त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र, पोलिस पडताळणी अहवाल आणि दोन लोकांची साक्ष मिळणे या गोष्टी भरती करताना महत्त्वाच्या आहेत. कोच अटेंडन्ट नेमका कुठून आला, त्याची पार्श्वभूमी काय? त्याच्यावर पूर्वी गुन्हा नोंद आहे का? या सर्व बाबी कंत्राटदाराकडून तपासणे गरजेचे आहे.

हीच बाब वेंडरांबाबतही लागू आहे. येथे हॉटेल्स आणि सर्वच प्लॅटफॉर्मवर फूड स्टॉल आहेत. वैध-अवैध वेंडरांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. यातील बहुतांश परप्रांतीय आहे. प्रवाशांसोबत त्यांची वागणूक योग्य नसते. प्रवाशांचे नेहमीच त्यांच्याशी वाद होतात. पण त्यांच्यावर प्रशासनाचा वचक नाही. मंगळवारी नागपूर स्थानकावर उघडकीस आलेल्या कोच अटेंडन्टच्या कृत्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

रेल्वे प्रशासनाकडून हवी माहिती

आरपीएफने केलेली कारवाई किंवा रेल्वेत घडलेल्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास लोहमार्ग पोलिसांकडे जातो. त्यामुळे गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी कंत्राटदारामार्फत नेमलेल्या कामगारांची माहिती रेल्वे प्रशासनाकडून लोहमार्ग पोलिसांना मिळायला हवी. संपूर्ण माहिती रेकॉर्डवर राहिल्यास त्यांच्यात धास्ती निर्माण होईल, असा विश्वास लोहमार्ग पोलिसांना आहे.

कंत्राटदारामार्फत नेमलेले कामगार, वेंडर किंवा अटेंडन्टची माहिती व त्यांचे व्हेरिफिकेशन रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला मिळत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्यांच्या चारित्र्याचे व पोलिस पडताळणीचे प्रमाणपत्र आमच्यापर्यंत पोहोचविण्याचे कळविणार आहोत- डॉ. अक्षय शिंदे, लोहमार्ग पोलिस अधीक्षक, नागपूर(Latest Marathi News)

कोच अटेंडन्टचे कंत्राटदारामार्फत पोलिस व्हेरिफिकेशन होते. वेंडरांचेही व्हेरिफिकेशन करण्यात येते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांचे आम्ही समुपदेशन करणार आहोत- आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक- मध्य रेल्वे, नागपूर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

'आई कायम जिवंत राहावी म्हणून झाडं लावली' सयाजी शिंदे वृक्षलागवडीबद्दल म्हणाले, 'सरकारने जमीन हिरावली पण...'

Latest Marathi News Live Update : राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा - जयंत पाटील

Vaibhav Sooryavanshi च्या प्रभावाखाली झाकून जाण्यापेक्षा, यशस्वी जैस्वाल याला RR सोडण्याचा सल्ला; Mumbai Indians योग्य पर्याय...

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

SCROLL FOR NEXT