अमोल मिटकरी गुगल
नागपूर

Nagpur : अन्यथा हे अधिवेशन पिकनिक अधिवेशन ठरेल ; अमोल मिटकरी

आमचा आरोप आहे की शेतकर्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आग्रही नाही.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांना थर्टीफस्ट साजरे करण्याची घाई झालेली आहे. दोन आठवड्यापासून शेतकर्यांच्या प्रश्नावर, विदर्भाच्या मुद्यावर अधिवेशनात चर्चा झालेली नाही. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. अन्यथा हे अधिवेशन पिकनिक अधिवेशन ठरेल, असे मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सभागृहाबाहेर व्यक्त केले.

आमचा आरोप आहे की शेतकर्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आग्रही नाही. हरितक्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईकांनी विविध योजना राबविल्या होत्या. हा भाग सुजलाम सूफलाम व्हावा ही नाईकांची अपेक्षा होती. परंतु नागपूर अजूनही मागास आहे. अशात नागपुरात अधिवेशन होते आणि त्यात विदर्भावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मिटकरी म्हणाले. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सरकार उद्या पॅकेज घोषणा करणार.

मात्र हे सरकार केवळ घोषणा करते. अंमलबजावणी करीत नाही. देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे. तूम्ही सत्तेत आल्यावर मुंबईचे का होता. एका वेळी तूम्ही भिष्म प्रतिज्ञा केली होती की विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही. ते मात्र विदर्भाकडेच दूर्लक्ष करीत आहे. विदर्भामुळे हे राज्य पोसले जाते. त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: आधी डोक्यात टीव्ही फोडला, नंतर हंड्याने बेदम मारहाण, पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; ठाण्यात काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासह विशेष विमानाने दिल्लीला जात आहेत

Obesity Care: लठ्ठपणाविरोधातील लढ्याला चालना; वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे अत्याधुनिक ऑबेसिटी क्लिनिकची सुरुवात

"दुनियादारीनंतर मी हवेत होतो" संजय जाधव यांचा धक्कादायक खुलासा "सेटवर मी टाईमपास केला"

Bakri Eid Goat Market: तळेगाव ढमढेरे बाजारात बोकडाला ८० हजार रुपये बाजार भाव, विक्रमी आवक

SCROLL FOR NEXT