Nagpur police action Success in finding two missing minor girls Left home on anger of parents esakal
नागपूर

Nagpur Police Action : बेपत्ता दोन अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश; पालकांच्या रागावर सोडले घर

शुल्लक कारणावरून साेडले हाेते घर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलींना शोधून काढण्यात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला यश आले आहे. पालकांनी रागाविल्यामुळे मुलींनी घर सोडले होते. मुली घरी परतल्या नसल्याने पालकांची धाकधूक वाढली होती. त्या सुखरूप मिळाल्याने पालकांची वाढलेली धास्ती मिटली. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

तहसील ठाण्यांतर्गत राहणारी १४ वर्षीय मुलगी ही नववीची विद्यार्थिनी आहे. घरची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. तिला झुला झुलायचा असल्याने तिने आईला पैसे मागितले. मात्र, आईने पैसे दिले नाही.

आईचा राग मनात धरून कोणाला काही न सांगता ती घरून निघाली. अंधार पडायला लागला, मात्र ती घरी परतली नाही. पालकांची धडधड सुरू झाली. सर्वत्र विचारपूस आणि चौकशी केली. मात्र, तिचा पत्ता लागला नाही.

अखेर तहसील पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली. रागाच्या भरात सारीका मोठा ताजबाग परिसरात गेली. दर्गा परिसरातच ती थांबली. भाविकांनी दिलेला प्रसाद खाऊन ती आराम करायची.

मात्र, तिच्या मनातील राग निघाला नव्हता. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथक रेखाच्या शोधात निघाले, रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी तिचा शोध घेण्यात आला.

मोबाईलचे वेड

दुसरी घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ती १७ वर्षाची आहे. ती दिवसभर मोबाईलमध्ये वेळ घालवत होती. तिने अभ्यास करावा. उच्च शिक्षण घ्यावे आणि नाव कमवावे, अशी पालकांची इच्छा होती.

त्यामुळे पालक मोबाईलवरून नेहमी तिला रागवायचे. सोमवार ३ जुलै रोजी सुद्धा पालकांनी तिला रागावले. हा राग मनात धरून तिने घर सोडले. मित्रासोबत ती मोरफाट्याची जत्रा पाहायला गेली.

इकडे रात्र होऊनही जया घरी न परतल्याने आई-वडील चिंतेत पडले. त्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी बेपत्ताची नोंद केली. ती राजीवनगर भागात मित्रासोबत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली.

पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. आस्थेने विचारपूस करून पालकांच्या सुपूर्द केले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, समाधान बजवळकर, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबूसकर, ज्ञानेश्वर ढोके, मनीषा पराये, दीपक बिंदाने, आरिफ शेख, ऋषिकेश डुमरे, आरती चव्हाण, अश्विनी खोडपेवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT